Header

Bombay High Court | ‘या’ प्रकरणात शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना न्यायलयाचा दणका

Bombay High Court | ‘या’ प्रकरणात शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना न्यायलयाचा दणका

Bombay High Court | bombay high court rejects the anticipatory bail plea filed by former shiv sena mp anandrao adsul

मुंबई : बहुजननाम ऑनलाइन – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money laundering case) शिवसेनेचे (Shivsena) माजी खासदार आनंदराव अडसूळ (Former MP Anandrao Adsul) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दणका दिला आहे. आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून (Pre-arrest bail application rejected) लावला आहे. मागील महिन्यात देखील मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

 

ईडीने (ED) घरावर छापा टाकल्यानंतर तसेच चौकशीसाठी (Enquiry) बोलावल्यानंतर अटकेच्या (Arrest) भीतीने आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली होती. त्यांनी ईडीचे समन्स (ED summons) रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु उच्च न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता. तसेच अटक टाळायची असेल तर कनिष्ठ न्यायालायत दाद मागण्याची मुभा दिली होती. त्यानंतर अडसूळ यांनी विशेष न्यायालयात (special court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर निर्णय देताना अडसूळ यांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता.

 

 

आनंदराव अडसूळ हे बँकेचे माजी अध्यक्ष असून त्यांनी बँकेत 980 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार (corruption) केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

 

 

Web Title :- Bombay High Court | bombay high court rejects the anticipatory bail plea filed by former shiv sena mp anandrao adsul

 

 

Parambir Singh | माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी निलंबनाचा आदेश धुडकावला

 

Pune Crime | सुरक्षारक्षकाने ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा ऐवज नेला चोरुन; भिंतीला भोक पाडून शिरला दुकानात, पत्नीसह गेला पळून

 

LIC policyholders IPO | पॉलिसी धारकांनी तात्काळ करून घ्यावं PAN कार्ड अपडेट, LIC आयपीओमध्ये होईल ‘हा’ मोठा फायदा

 

EPF अकाऊंट करा अपडेट, मिळेल 7 लाख रुपयांपर्यंतचा फायदा; जाणून घ्या योजना

 

PDCC Election | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अजित पवारांचा अर्ज दाखल

 

Chitra Wagh | चित्रा वाघ यांचं गृहमंत्र्यांना पत्र; म्हणाल्या – ‘रक्षकांना भक्षक बनवणारे धोरण स्वीकारले का?’

 

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 85 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

The post Bombay High Court | ‘या’ प्रकरणात शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना न्यायलयाचा दणका appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article