Header

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today | gold price fall on today 1 december 2021 and silver rate rose check latest gold and silver rate.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price Today) सातत्याने बदलत असतात. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत सोन्याच्या भावात वाढ होताना पाहायला मिळालं. मात्र, दोन दिवसांच्या तेजीनंतर आज (बुधवारी) सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर, चांदीचे दर वधारले आहेत. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव (Gold Price) 47,795 आहे. तर, चांदीचा दर (Silver Price) 62,376 रुपये पर्यंत पोहचला आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) आज डिसेंबर डिलीव्हरी सोन्याच्या दरात 0.02 टक्के घसरणीची नोंद झाली. तर चांदीचा दर 0.14 टक्क्यांच्या तेजीसह ट्रेड करत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमी आहे. गेल्या वर्षी सोन्याचा दर पन्नास हजाराच्या पुढे होता. दरम्यान, त्या तुलनेत यंदाचा सोन्याचा भाव पन्नास हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today).

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सोन्याची शुद्धता कशी तपासाल ?

‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकणार आहे. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळणार आहे.

दरम्यान, तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

Web Title : Gold Silver Price Today | gold price fall on today 1 december 2021 and silver rate rose check latest gold and silver rate.

 

Akshay Kumar | 25 वर्षांपासून लोकांना मूर्ख बनवत होता अक्षय कुमार, समोर आले ‘अंडरटेकर’ सोबतच्या कुस्तीचे सत्य

Omicron Covid Variant | महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 7 दिवस क्वारंटाईन अनिवार्य, RT-PCR चाचणी होणार 3 वेळा

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेला जोरदार झटका ! 100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर; जाणून घ्या

Senior Citizens Get These Tax Benefits | ज्येष्ठ नागरिकांना मिळतात ‘हे’ टॅक्स बेनिफिट, तुम्ही कधी घेतला आहे का लाभ! जाणून घ्या सर्वकाही

The post Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचा भाव appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article