Header

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, शताब्दी आणि दुरंतो ट्रेनमध्ये मिळेल फ्रेश फूड, जाणून घ्या डिटेल

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, शताब्दी आणि दुरंतो ट्रेनमध्ये मिळेल फ्रेश फूड, जाणून घ्या डिटेल

 Indian Railways | indian railways to resume onboard catering services in shatabdi and duronto express trains details here
मुंबई : बहुजननाम ऑनलाइन भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. आता लवकरच ट्रेनमध्ये प्रवास करताना ताजे जेवण मिळेल. काही दिवसांपूर्वीच रेल्वे बोर्डाने (Railway Board) ट्रेनमध्ये पँट्री कार सुरू करण्याचा आदेश दिला होता. (Indian Railways)

आता पश्चिम रेल्वे झोनने (Western Railway) शताब्दी एक्सप्रेस (Shatabdi Express) आणि दुरंतो एक्सप्रेस (Duronto Express) ट्रेनमध्ये शिजवलेले जेवण आणि रेडी टू ईट (Ready To Eat) मीलसोबत ऑनबोर्ड कॅटरिंग सर्व्हिस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Indian Railways)

पश्चिम रेल्वेकडून जारी एका वक्तव्यानुसार, ट्रेन नंबर 12009/10 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद-मुंबई सेंट्रल शताब्दी एक्सप्रेस आणि ट्रेन नंबर 22209/10 मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेसमध्ये ऑनबोर्ड कॅटरिंग सर्व्हिस 10 डिसेंबर 2021 पासून सुरू केली जाईल. प्रवाशांना 10 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या प्रवासाच्या तारखांसाठी कॅटरिंग सर्व्हिसने ऑप्टिंग आऊट पर्याय दिला आहे.

रेल्वेने याबाबत सर्व संबंधित विभाग आणि स्टेक होल्डर्सला अगोदरच एक आदेश जारी केला होता.आदेशानुसार, सध्या हे केवळ राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदे भारत, तेजस आणि गतिमान कॅटेगरीच्या ट्रेनसाठी लागू होईल.त्या प्रवाशांसाठी, ज्यांनी अगोदरच तिकिट बुक केले होते.

आदेशानुसार, आयआरसीटीसी संबंधित झोनल रेल्वेला त्या तारखेबाबत सूचित करेल,जेव्हापासून अ‍ॅडव्हान्स रिझर्व्हेशन पिरियडच्या आत येणार्‍या प्रवाशासाठी एखाद्या विशेष ट्रेनमध्ये शिजवलेल्या जेवणासह ऑनबोर्ड कॅटरिंग सर्व्हिस पुन्हा सुरू केली जाईल.

झोनल अधिकार्‍यांना सुद्धा एसएमएस आणि ई-मेलच्या माध्यमातून ई-तिकिट प्रवाशांना सूचित करणे आवश्यक आहे की, ज्यांनी अगोदरच तिकिट बुक केले आहे.

 

 

Web Title :- Indian Railways | indian railways to resume onboard catering services in shatabdi and duronto express trains details here

 

 

Life Insurance | लाईफ इन्श्युरन्स घेताना कधीही करू नका ‘ही’ चूक, मिळणार नाही ‘क्लेम’

 

Jayant Patil-Devendra Fadnavis | जयंत पाटलांचा निशाणा; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांना कुसुमाग्रजांबद्दल अनादर, सतत सावरकरांचा उल्लेख’ (VIDEO)

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 782 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

COEP Jumbo Covid Centre | ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्‍वभूमीवर महापालिका ‘अलर्ट’ !

The post Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, शताब्दी आणि दुरंतो ट्रेनमध्ये मिळेल फ्रेश फूड, जाणून घ्या डिटेल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article