Header

Multibagger Penny stock | 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 68 लाख, टाटा ग्रुपची आहे कंपनी

Multibagger Penny stock | 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 68 लाख, टाटा ग्रुपची आहे कंपनी

Multibagger Penny Stock | multibagger penny stock tata teleservices 6800 percent return last 15 months

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Penny stock | टाटा ग्रुप (Tata Group) च्या एका कंपनीने मागील दिड वर्षात जबरदस्त रिटर्न दिला आहे. मात्र, हा पेनी स्टॉक (Penny Stock) आहे. कोरोना संकटादरम्यान हा स्टॉक मल्टीबॅगर (Multibagger Penny stock) ठरला आहे. शेयरमध्ये आजसुद्धा अपर सर्किट लागले आहे.

Tata Teleservices ने मागील दिड वर्षात आपल्या रिटर्नने गुंतवणुकदारांना आश्चर्यचकित केले आहे. हा Stock मागील दिड वर्षात 2.75 रुपयांवरून वाढून 187 रुपयांचा झाला आहे. आज सुद्धा या शेयरमध्ये 5 टक्के अपर सर्किट लागले आहे. Tata Teleservices ब्रॉडबँड, दूरसंचार आणि क्लाऊड सेवा उपलब्ध करते.

बाजारात चढ-उताराचा परिणाम नाही

Tata Teleservices Share ने दिड वर्षात सुमारे 68 पट रिटर्न दिला आहे. या स्टॉकमध्ये लागोपाठ तेजी दिसत आहे. मागील 1 महिन्यात हा स्टॉक 107.20 रुपयांवरून वाढून 187.20 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजे बाजारात चढ-उताराचा यावर परिणाम होत नसल्याचे दिसत आहे.

एक वर्षात हा मल्टीबॅगर स्टॉक 7.85 रुपयांवरून वाढून 187 रुपयांवर पोहचला आहे. या दरम्यान सुमारे 2400 टक्के तेजी पहायला मिळली आहे. टाटा ग्रुपचा हा शेयर मागील वर्षी 16 ऑक्टोबरला 2.75 रुपयांचा होता, जो आता वाढून 187 रुपयांचा झाला आहे. या कलावधीत या स्टॉकमध्ये सुमारे 6800 टक्के तेजी पहायला मिळाली आहे. (Multibagger Penny stock)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

अशाप्रकारे जर एखाद्या गुंतवणुकदाराने 16 ऑक्टोबर 2020 ला या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर ती गुंतवणूक आज वाढून 68 लाख रुपयांची झाली असती. म्हणजे केवळ 15 महिन्याच्या काळात या स्टॉकने एक लाखाचे 68 लाख रुपये बनवले आहेत. Tata Teleservices एक मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.bahujannama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title : Multibagger Penny Stock | multibagger penny stock tata teleservices 6800 percent return last 15 months

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 5368 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Suman Kale Death Case | सुमन काळे पोलीस कोठडी मृत्यू! सक्षम व निष्पक्ष सरकारी वकिल नेमणेबाबत राज्यपालांना निवेदन

Rashifal 2022 | वार्षिक राशिफळ 2022 ! मेषपासून मीन राशीपर्यंत ‘नशीबाचे कनेक्शन’, जाणून घ्या कसे असेल तुमचे ‘नवीन वर्ष’

The post Multibagger Penny stock | 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 68 लाख, टाटा ग्रुपची आहे कंपनी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article