Header

Pune Crime | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल; 32 वर्षीय महिलेची पोलीस ठाण्यात धाव, प्रचंड खळबळ

Pune Crime | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल; 32 वर्षीय महिलेची पोलीस ठाण्यात धाव, प्रचंड खळबळ

Pune Crime | Rape case registered on NCP Corporator Sunil alias Bandutatya Gaikwad's Son Sameer Gaikwad in Mundhwa Police Station of Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या (Pune NCP Corporator) मुलाने एका महिलेवर वारंवार बलात्कार (Rape in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Pune Crime) आहे. समीर बंडुतात्या गायकवाड Sameer Bandutatya Gaikwad (रा. मुंढवा गाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा (Mundhwa News) येथे राहणार्‍या एका 32 वर्षाच्या महिलेने मुंढवा पोलिसांकडे (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपी समीर गायकवाडचे (Sameer Gaikwad) भाजी घेण्यासाठी फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते. सुमारे दीड वर्षापूर्वी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या एकट्या घरात असताना आरोपी घरी आला. किचनमध्ये त्याने फिर्यादी यांच्या कमरेस पकडले. त्यांनी विरोध केल्यावर मुलांना व पतीस मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर बलात्कार (Rape) केला. या प्रकारानंतर फिर्यादी घाबरुन गेल्या होत्या. त्यानंतरही त्याने फिर्यादी यांचे तोंड पकडले व खाली पाडले. त्यांच्यावर जबरदस्ती करु लागला. त्यांनी विरोध केल्यावर तुझ्या नवर्‍याला व मुलांना जीवे मारण्याची, तुमचे खानदान संपवून टाकीन, अशी धमकी (Pune Crime) दिली.

या धमकीमुळे तिने कोणाला हा प्रकार सांगितला नव्हता. त्यानंतर 17 डिसेबर 2021 रोजी दुपारी 2 वाजता समीर गायकवाड याने फिर्यादी यांच्याशी पुन्हा जबरदस्तीने शरीरसंबंध करीत होता. त्यावेळी फिर्यादीचे पती व मुलाने हा प्रकार पाहिला. तेव्हा त्याने त्यांना मारण्याची धमकी देऊन निघून गेला. या प्रकारानंतर आता त्यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समीर गायकवाड याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनिल ऊर्फ बंडु जयवंतराव गायकवाड (Sunil alias Bandutatya Jaywant Gaikwad) यांनी आपल्याकडून जबरदस्तीने खंडणी (Ransom) मागितल्याचा आरोप करीत मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, मुलगा समीर हा 17 डिसेबर 2021 रोजी भाजी खरेदी करण्यासाठी गेला असता विवाहितेच्या पतीने त्यास घरात बोलावून चहा दिला व तो बाहेर आला.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

तेव्हा समीर हा त्याच्या पत्नीशी बोलत असताना त्याने तिचा विनयभंग (Molestation Case) केला असे खोटे भासवून समीर याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार देण्याची भिती दाखवून व त्यांच्या प्रतिष्ठेस बाधा आणण्याची भिती दाखवून ही विवाहिता, तिचा पती, मुलगा व त्यांची आई, भाऊ यांनी आपल्याला जबरदस्तीने 3 लाख रुपये देण्यास भाग (Extortion Case) पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मुंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Rape case registered on NCP Corporator Sunil alias Bandutatya Gaikwad’s Son Sameer Gaikwad in Mundhwa Police Station of Pune

Municipal Election Pune Division | पुणे विभागातील 41 नगरपालिकांवर ‘प्रशासकराज’, निवडणुका लांबल्याने निर्णय

Pune Food Poisoning Navguru Institute | भोर येथील नवगुरु इंस्टिट्यूटमधील 28 मुलांना विषबाधा; 6 जणींची तब्बेत खालवल्याने ससूनमध्ये दाखल

Jio Best Plan | जिओ देतंय कमी किंमतीत दररोज 1.5 GB Data अन् अनलिमिटेड कॉलिंग; जाणून घ्या प्लॅन

The post Pune Crime | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल; 32 वर्षीय महिलेची पोलीस ठाण्यात धाव, प्रचंड खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article