Header

Pune Crime | ‘कोलते पाटील डेव्हलपर्स’ची 44 लाख रुपयांची फसवणूक; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Crime | ‘कोलते पाटील डेव्हलपर्स’ची 44 लाख रुपयांची फसवणूक; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Crime | kolte patil developers 44 lakh fraud two arrested by pune police crime branch.

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन  – Pune Crime | पुण्यातील नामाकींत ‘कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड’ (Kolte-Patil Developers Limited) या बांधकाम कंपनीची (Pune Crime) त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी 44 लाख रुपयांची फसवणूक (fraud) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक (Arrested) केली आहे.

 

याबाबत माहिती अशी, फिर्यादी हर्षल नावगेकर (Hershal Navgekar) हे कोलते-पाटील डेव्हलपर्समध्ये सिनियर मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांच्या कंपनीमध्ये यापूर्वी राठी, साखळे, भिलारे आणि पाटील हे काम करीत होते. कोलते पाटील डेव्हलपर्सच्या ग्राहक असलेल्या काही वेंडर कंपन्यांसोबत असलेल्या आर्थिक व्यवहारांचा आरोपींनी दुरुपयोग केला. या आरोपींनी 15 जून 2018 ते 2 सप्टेंबर 2019 या कालावधीत कंपनीच्या रेकॉर्डवर नसलेल्या बोगस व्हेंडर कंपन्यांच्या नावाने पेमेंट केले. त्यातील पैसे स्वतःच्या फायद्याकरता वापरले. तसेच, कंपनीची अधिकृत व्हेंडर कंपनी असलेल्या ‘स्टील पॉईंट’च्या नावाने खोटे आणि बोगस कागदपत्रे तयार बँकेत अकाऊंट काढले. (Pune Crime)

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

दरम्यान, यानंतर कंपनीतील कॅन्सल केलेला चेक त्या खात्यावर डिपॉझिट केला. त्यातून पैसे काढून घेऊन एकूण 44 लाख 1 हजार 637 रुपयांची फसवणूक केली. कंपनीकडून यासंदर्भात गुन्हे शाखेकडे (Crime Branch) तक्रार दिली होती. यानूसार अमोल गेंदलाल साखळे (Amol Gendlal Sakhale), कुलदीप भिलारे (Kuldeep Bhilare), चेतन पाटील (Chetan Patil), महेश बालकिशन राठी (Mahesh Balkishan Rathi) अशी गुन्हा (FIR) दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राठी आणि पाटील या दोघांना अटक (Arrested) केली आहे. याप्रकरणी अधिक तपास एपीआय प्रकाश मोरे (API Prakash More) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | kolte patil developers 44 lakh fraud two arrested by pune police crime branch.

 

Multibagger Stock | 152 रुपयांचा स्टॉक झाला 1,524 रुपयांचा, गुंतवणुकदारांना दिला 900% रिटर्न, तुमच्याकडे आहे का?

JanDhan Account | जनधन खातेधारकांसाठी खुशखबर ! आता बॅलन्स नसताना घेऊ शकता 10 हजार रुपयांचा फायदा, जाणून घ्या

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना नवीन वर्षात मिळणार भेट ! सॅलरीत जमा होणार ‘हा’ अलाऊन्स, लवकर पूर्ण करा हे काम

Varsha Gaikwad | शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं विधान; म्हणाल्या – ‘…तर शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेऊ’

The post Pune Crime | ‘कोलते पाटील डेव्हलपर्स’ची 44 लाख रुपयांची फसवणूक; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article