Pune Crime | पुण्याच्या औंधमध्ये नाना गायकवाडनंतर आणखी एक सावकारीचे मोठे ‘मॅटर’ उघडकीस ! पुणे पोलिसांकडून 5 कोटीच्या प्रकरणात नाना वाळकेसह दोघांना अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | अनेकांना पैसे देऊन त्यांच्याकडून भरमसाट व्याजाची मागणी करुन धमकाविणार्या नानासाहेब गायकवाड (Nanasaheb Gaikwad) याच्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता औंधमधील (Aundh News) आणखी एका हाय प्रोफाईल व्यक्तीवर चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) सावकारी प्रकरणी (Money Lenders in Pune) कारवाई करुन अटक केली आहे. रामदास ऊर्फ नाना गोपीनाथ वाळके Ramdas alias Nana Gopinath Walke (वय ३७ रा. जय गणेशनगर, विधातेवस्ती, औंध) आणि त्याचा साथीदार अनिकेत रमेश हजारे Aniket Ramesh Hazare (वय ३८, रा. हजारे सदन, दापोडी) अशी अटक केलेल्यांची (Pune Crime) नावे आहेत.
हा प्रकार ऑगस्ट २०१५ ते १० डिसेंबर २०२१ दरम्यान घडली आहे.
याप्रकरणी बालेवाडी (Balewadi News) येथील एका ३५ वर्षाच्या व्यावसायिकाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी नाना वाळके (Nana Walke) याच्याकडून ३ कोटी ५० हजार रुपये घेतले होते. या रक्कमेच्या मोबदल्यात फिर्यादी यांनी अनिकेत हजारे यांच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये बँकेद्वारे ३ कोटी २ लाख २७ हजार रुपये व रोखीने २ कोटी ७ लाख ७३ हजार रुपये असे एकूण ५ कोटी १० लाख रुपये परत केले आहेत. असे असतानाही अनिकेत हजारे याने फिर्यादीच्या नावावर असलेल्या गाड्यांचे आर सी बुक, चेक घेतले. तसेच त्यांच्याकडून बळजबरीने प्रॉमिसरी नोट (Promissory Note) लिहून घेतली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फिर्यादी यांच्याविरुद्ध खोट्या बातम्या प्रकाशित केल्या. शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्याकडे ४ कोटी ७५ हजार रुपयांची मागणी केली. त्यावर नाना वाळके यांनी फिर्यादी यांना तू अनिकेत हजारे याला पैसे देऊन विषय संपव. नाही तर तो इतर लोकांना एकत्र आणून तुझ्याविरुद्ध १० ते १५ खोट्या तक्रारी दाखल करीन, तुझा गेम टाकायला कमी करणार नाही. स्वत:चा व कुटुंबाचा विचार कर, अशी धमकी देऊन फिर्यादीची आर्थिक पिळवणूक (Pune Crime) केली. या प्रकारानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. चतु:श्रृंगी पोलिसांनी खंडणी (Extortion Case) व सावकारी अधिनियमाखाली (Money Laundering) गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे (Senior Police Inspector Rajkumar Waghchaure) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास सुरु आहे.
Web Title :- Pune Crime | After Nana Gaikwad in Pune’s Aundh, another big ‘matter’ of moneylender has been revealed! Pune police arrested Ramdas alias Nana Gopinath Walke and Aniket Ramesh Hazare in a Rs 5 crore case
The post Pune Crime | पुण्याच्या औंधमध्ये नाना गायकवाडनंतर आणखी एक सावकारीचे मोठे ‘मॅटर’ उघडकीस ! पुणे पोलिसांकडून 5 कोटीच्या प्रकरणात नाना वाळकेसह दोघांना अटक appeared first on बहुजननामा.