Header

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Pune Crime | The court rejected the bail plea of the accused seeking ransom from Builder Yuvraj Dhamale, a well-known builder in Pune.

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Crime |पुण्यातील (Pune Crime) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले (Builder Yuvraj Dhamale) यांना गाडीखाली चिरडून मारण्याची धमकी देऊन 15 लाखांची खंडणीची (ransom) मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) तीन जणांवर खंडणीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. गुन्हा (Pune Crime) दाखल झाल्यानंतर आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी (pre-arrest bail) सत्र न्यायालयात (Sessions Court) अर्ज केला होता. न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला (application rejected) असल्याची माहिती फिर्यादी युवराज ढमाले यांचे वकील अॅड. विजयसिंह ठोंबरे (Adv Vijaysinh Thombare) यांनी दिली.

 

पुण्यातील (Pune Crime) प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक युवराज सिताराम ढमाले (वय-41 रा. अक्षयनगर, धनकवडी, पुणे) यांनी बुधवारी (दि. 22) कोंढवा पोलीस ठाण्यात खंडणी मागितले प्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी रविलाला देवजीभाई प्रजापती Ravilala Devjibhai Prajapati (रा. राजगृही रेसिडेन्सी, गोकुळ हॉटेल समोर, कोंढवा) आणि जितु प्रजापती Jitu Prajapati (पत्ता माहित नाही) यांच्यासह अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. आरोपी रविलाल प्रजापती आणि जितू प्रजापती यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी सरकार तर्फे सरकारी वकील ॲड. राजेश कावेडिया (Public Prosecutor Adv. Rajesh Kavedia) व फिर्यादी युवराज ढमाले तर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी जोरदार विरोध केला. फिर्यादी यांची बाजू ऐकून सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल (Sessions Judge G. P. Agarwal) यांनी आरोपींचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

काय आहे प्रकरण?

फिर्यादी युवराज ढमाले यांची कोंढव्यातील गोकुळ हॉटेल (Gokul Hotel) समोर साईट सुरु आहे. काम पुर्ण झालेल्या बांधकामाच्या साईटवरील बहुतांश फ्लॅटचा ताबा काही सदस्य वगळता इतरांना देण्यात आला आहे. तसेच फ्लॅट धारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Society) अंतर्गत सोसायटी स्थापन केली आहे.

आरोपी रविलाला प्रजापती यांना फ्लॅटचा ताबा दिलेला आहे.
तरीदेखील प्रजापती याने जितू प्रजापती व अन्य आरोपीच्या मदतीने सदस्यांनी मिटिंग बोलावुन, कॉमन अॅमिनिटीजचा (Common Amenities) ताबा अजुन दिला नाही असे म्हणत वाद घातला.

 

सोसायटीच्या सदस्यांना भडकवुन तुमच्याविरुद्ध तक्रार करायला भाग पाडुन,
तुमची बदनामी करीन अशी धमकी दिली. तसेच 15 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करुन रक्कम न दिल्यास गाडीखाली चिरडून टाकण्याची (crushed under car) धमकी (Threat) दिली. युवराज ढमाले यांनी आवश्यक पुरावे दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला.

 

Web Title :- Pune Crime | The court rejected the bail plea of the accused seeking ransom from Builder Yuvraj Dhamale, a well-known builder in Pune.

 

Pune Metro-Sambhaji Bridge Traffic | पुण्यातील संभाजी पुलावरील (लकडी पुल) वाहतूक ‘या’ वेळेत बंद राहणार

Sudhir Mungantiwar | ‘महाविकास आघाडी सरकार बाराही महिने झोपतं, यांना पाहून कुंभकर्णही म्हणेल, ‘रिश्ते में ये हमारा बाप लगता है’ – सुधीर मुनगंटीवार

Aadhaar Card | आधार कार्ड गहाळ झाल्यास ‘या’ क्रमांकावरुन मिळवा नवीन आधार; जाणून घ्या महत्वाची प्रक्रिया

Pune Crime | महिंद्रा लाइफस्पेस कंपनीकडून ब्लास्टिंग, परिसरातील घरांना तडे; नागरिकांची न्यायालयात धाव

The post Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article