Header

Sanjay Raut | संजय राऊतांचा इशारा; म्हणाले – ‘…तर नारायण राणे यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो’

Sanjay Raut | संजय राऊतांचा इशारा; म्हणाले – ‘…तर नारायण राणे यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो’

Sanjay Raut | bjp-mp-and union minister narayan rane may also be charged shiv sena mp sanjay rauts warning

नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – Sanjay Raut | शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) मारहाण प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक होणार अशी चर्चा आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांत आरोपांच्या फैरी झडत असल्याचे दिसते. यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘नितेश राणे कुठे आहेत, याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी लपवली तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो,’ असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत म्हणाले, ‘हत्येच्या प्रयत्नातील हव्या असणाऱ्या आरोपीला पोलीस शोधत आहेत. मात्र केंद्रीय मंत्री म्हणत आहेत की मला माहीत आहे पण सांगणार नाही. हे कायद्याचं उल्लंघन आहे. आपण केंद्रीय मंत्री आहात, पोलिसांना सहकार्य करा. कायद्यापासून महत्वाची माहिती लपवू नका. आपला मुलगा असेल तरी माहिती देणे गरजेचं आहे. अन्यथा आरोपींना पाठीशी घातलं म्हणून तुमच्यावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो,’ असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

दरम्यान, नितेश राणेंबाबत महाविकास आघाडी सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता.
यावरुनही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिलं आहे. ‘राजकीय सुडापोटी आमच्यावर काय करावाई झाली याचा मी एक साक्षीदार आहे. भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरपावर करून महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांच्या कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई केली जात असल्याचं ते म्हणाले.

 

 

Web Title :- Sanjay Raut | bjp-mp-and union minister narayan rane may also be charged shiv sena mp sanjay rauts warning

 

 

MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंवर अटकेची तलवार कायम? जामीन अर्जावर उद्या निर्णय

 

Rule Change | 1 जानेवारीपासून LPG सिलेंडरच्या दरापासून डिजिटल पेमेंटच्या नियमापर्यंत होणार ‘हे’ 13 मोठे बदल; जाणून घ्या

 

Maharashtra Corona Restrictions | राज्यात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत वाढ ! 2 दिवसांत निर्बंधाबाबत घेणार निर्णय; राजेश टोपेंची माहिती

The post Sanjay Raut | संजय राऊतांचा इशारा; म्हणाले – ‘…तर नारायण राणे यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article