Smriti Irani | स्मृती इराणींच्या मुलीनं केला साखरपुडा, जाणून घ्या जावई कोण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP) आघाडीच्या महिला नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) या राजकारणाबरोबरच (Politics) वैयक्तिक जीवनातही नेहमीच चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी एक आनंदाची बातमी आपल्या इंस्टाग्रामवरून (Instagram) दिली आहे. ही बातमी म्हणजे त्यांची मुलगी जोईश हिच्या साखरपुड्याची आहे. स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी कन्या आणि जावयाचा (Son-in-Law) फोटो देखील शेअर केला आहे.
या फोटोमध्ये जोईश (Joyce Irani) हिचा बॉयफ्रेंड अर्जुन भल्ला (Arjun Bhalla) गुडघ्यावर बसून तिला साखरपुड्याची अंगठी (Engagement Ring) घालताना दिसत आहेत. त्याचबरोबर स्मृती इराणी (Smriti Irani) आणखी एक फोटो शेअर केला असून त्यात जोईश आणि अर्जुन रोमँटिक पोझमध्ये दिसत आहे. या जोडप्याचे फोटो शेअर करता स्मृती इराणी यांनी लिहिले आहे की, ही पोस्ट त्या व्यक्तीसाठी ज्याने आम्हा सर्वांचे मन जिंकले आहे. आमच्या कुटुंबात तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सासरे म्हणून एका अवलिया व्यक्तीचा सामना करावा लागणार आहे. ही माझी तुम्हाला अधिकृत सूचना आहे. गॉड ब्लेस…
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आपल्या मुलीच्या साखपुड्याचा फोटो स्मृती इराणी यांनी शेअर केल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रांग लागली आहे. अभिनेत्री मौनी रॉय (Actress Mauni Roy), एकता कपूर (Ekta Kapoor), दिव्या शेठ साह (Divya Sheth Sah) यांसारख्या सेलेब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहे. स्मृती इराणी या अभिनेत्री असून त्या राजकारणातही सक्रीय आहेत. 2014 पासून केंद्रीय मंत्री म्हणून काम करत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा (Rahul Gandhi) पराभव केला होता. सध्या मोदी सरकारमध्ये (Modi government) त्या महिला आणि बालकल्याणमंत्री आहेत.
Web Title :- Smriti Irani | smriti iranis daughter made engagement look arjun bhalla who their son law
Rain in Maharashtra | थंडीच्या दिवसात पडणार पाऊस, राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट
Vastu Tips | ‘हे’ 7 संकेत सांगतात की बदलणार आहे तुमचे नशीब, तुमच्या घरी होणार आहे पैशांचा पाऊस
The post Smriti Irani | स्मृती इराणींच्या मुलीनं केला साखरपुडा, जाणून घ्या जावई कोण appeared first on बहुजननामा.