Header

Padma Bhushan Award |  सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण’, राज्यातील ‘या’ 10 जणांना ‘पद्म’ पुरस्कार

Padma Bhushan Award |  सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण’, राज्यातील ‘या’ 10 जणांना ‘पद्म’ पुरस्कार

Padma Bhushan Award central government announces padma bhushan award to dr cyrus poonawala padma awards to these 10 people from maharashtra

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Padma Bhushan Award |  प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला पद्म (Padma), पद्मश्री आणि पद्मविभूषण (Padma Bhushan Award) पुरस्कारांची घोषणा झाली आहे. केंद्र सरकारकडून (Cetranl Government) देण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी यंदा महाराष्ट्रातील (Maharashtra) 10 जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रतिभावंत गायिका प्रभा अत्रे (Singer Prabha Atre) , सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India)  या लस उत्पादक कंपनीचे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला (Dr. Cyrus Poonawalla) यांच्यासह कला, आरोग्य, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील इतर 8 जणांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

प्रभा अत्रे यांची कला क्षेत्रातील योगदानाबाबत पद्मविभूषण पुरस्कारासाठी (Padma Vibhushan Award) निवड करण्यात आली आहे. तसेच सायरस पूनावाला आणि उद्योगपती नटराजन चंद्रशेखरन (Industrialist Natarajan Chandrasekaran) यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

राज्यातील 7 जणांना पद्मश्री
डॉ. हिंमतराव बावसरकर (Dr. Himmatrao Bawaskar), डॉ. विजयकुमार डोंगरे (Dr. Vijaykumar Dongre), डॉ. भीमसेन सिंघल (Dr. Bhimsen Singhal) आणि डॉ. बालाजी तांबे (Dr. Balaji Tambe) यांना आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी तर गायिका सुलोचना चव्हाण (Singer Sulochana Chavan) आणि गायक सोनू निगम (singer Sonu Nigam) यांना कला क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri Award) गौरवण्यात येणार आहे. अनिल कुमार राजवंशी (Anil Kumar Rajvanshi) यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामासाठी पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे.

Web Title : Padma Bhushan Award | central government announces padma bhushan award to dr cyrus poonawala padma awards to these 10 people from maharashtra

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

हे देखील वाचा

The post Padma Bhushan Award |  सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण’, राज्यातील ‘या’ 10 जणांना ‘पद्म’ पुरस्कार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article