Header

PDCC Election Results | पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार यांना मोठा धक्का? भाजपचे प्रदीप कंद विजयी, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच विजयाची नोंद, जाणून घ्या कोणाला किती मतं पडली

PDCC Election Results | पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार यांना मोठा धक्का? भाजपचे प्रदीप कंद विजयी, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच विजयाची नोंद, जाणून घ्या कोणाला किती मतं पडली

pdcc election results big blow to ncp leader ajit pawar in pune district bank elections bjps pradip kanda wins.

पुणे : बहुजननामा ऑनलाइन   – PDCC Election Results | राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोडून भाजपमध्ये (BJP) केलेल्या प्रदीप कंद (Pradip Kand) यांना उद्देशून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या अशा शब्दात निवडणुक प्रचारात टिका केली होती. त्यामुळे या बहुचर्चित निवडणुकीचे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यात प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश घुले (Suresh Ghule) यांचा जिल्हा बँकेच्या क वर्ग सहकारी बँका व पतसंस्था गटात १४ मतांनी पराभव केला. (PDCC Election Results)

मुळशी (Mulshi), हवेली (Haveli) पाठोपाठ या गटातही सुरेश घुले यांच्यासारख्या प्रस्थापितांना पराभवाची चव चाखावी लागली असून अजित पवार यांना हा धक्का असल्याचे मानले जात आहे. (PDCC Election Results)

प्रदीप कंद यांना ४०५ तर सुरेश घुले यांना ३९१ मते मिळाली. विशेष म्हणजे पवार यांच्या बारामतीमध्ये (Baramati) कंद यांना निर्णायक ५२ मते मिळाल्याने कंद यांचा विजय साकार होऊ शकला आहे. प्रदीप कंद यांच्या विजयामुळे भाजपाने जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (pune district central cooperative bank election) यंदा प्रस्थापित असलेल्या जुन्या संचालकांना पराभवा सामना करावा लागला आहे. सलग २२ वर्षे संचालक असलेले आणि माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे (atmaram kalate) आणि १५ वर्षे संचालक असलेले प्रकाश म्हस्के (prakash mhaske) यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मुळशी तालुका मतदारसंघातील मतमोजणीत आत्माराम कलाटे यांना १७ मते मिळाली तर सुनिल चांदेरे (Sunil Chandere ) यांनी २८ मते मिळवून विजय मिळविला आहे.

हवेली तालुका अ वर्ग प्रतिनिधी गटात गेल्या ३ निवडणुकांमध्ये विजय मिळविलेले प्रकाश म्हस्के हे चौथ्यांदा निवडून जाण्यासाठी तयार होते. मात्र, त्यांचे हे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत झालेल्या या लढतीत विकास दांगट (Vikas Dangat) यांनी ७३ मते मिळविली तर प्रकाश म्हस्के यांना ५९ मते मिळविता आली.
दांगट यांनी म्हस्के यांचा १४ मतांनी पराभव केला.

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या २१ जागा असून त्यापैकी १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
तर ७ जागांसाठी २ जानेवारी रोजी मतदार पार पडले होते.

 

web title : pdcc election results big blow to ncp leader ajit pawar in pune district bank elections bjps pradip kanda wins.

 

Cordelia Cruise-Covid-19 | आर्यन खान प्रकरणातील कॉर्डेलिया क्रूझवर कोरोनाचा ‘विस्फोट’ ! 66 प्रवाशांना कोरोनाची लागण, गोवा सरकारने प्रवेश नाकारला

Gold Price Today | खुशखबर ! आज चांदीच्या किमतीत मोठी घसरण, सोने सुद्धा झाले स्वस्त, जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

PDCC Election Results | पीडीसीसी बँक निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का ! सलग 22 वर्षे संचालक असलेले आत्माराम कलाटे, 15 वर्षे संचालक असलेले प्रकाश म्हस्के पराभूत; सुनिल चांदेरे, विकास दांगट विजयी

Pune Crime | पुण्यातील 29 वर्षीय महिला वकिलावर अत्याचार; चतु:श्रृंगी ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

The post PDCC Election Results | पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार यांना मोठा धक्का? भाजपचे प्रदीप कंद विजयी, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच विजयाची नोंद, जाणून घ्या कोणाला किती मतं पडली appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article