Header

Post Office NSC Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत चांगल्या व्याजासह मिळते करात सवलत, जाणून घ्या सविस्तर

Post Office NSC Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत चांगल्या व्याजासह मिळते करात सवलत, जाणून घ्या सविस्तर

Post Office NSC Scheme | post office nsc scheme good interest and tax exemption available

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Post Office NSC Scheme | पोस्ट ऑफिस (Post Office) हे नेहमीच गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित मार्ग राहिले आहे, लोकांसाठी येथे गुंतवणूक करणे देखील सोयीचे आहे. कारण पोस्ट ऑफिसच्या शाखा शहरांसह ग्रामीण भागात सुद्धा पसरलेल्या आहेत. त्यामुळे लोकांना पोस्ट ऑफिसपर्यंत पोहोचणे खूप सोपे झाले आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला चांगल्या व्याजासह करात सूट हवी असेल तर पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत योजना हा एक चांगला पर्याय असू शकतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही या योजनेत गुंतवणूक केली आहे. NSC योजनेबद्दल जाणून घेऊया. (Post Office NSC Scheme)

किती सुरक्षित आहे NSC ?

पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Saving Certificate) स्कीममध्ये गुंतवणूक करताना शून्य धोका असतो. तुम्ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक योजना शोधत असाल, तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. कारण हा पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनेचा भाग आहे आणि त्यात केलेल्या गुंतवणुकीलाही करात सूट मिळते.

NSC मध्ये कशी करावी गुंतवणूक –

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा किमान लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो. म्हणजे तुम्ही केलेली गुंतवणूक 5 वर्षांपर्यंत काढता येणार नाही. NSC मध्ये तीन प्रकारे गुंतवणूक करता येते. ज्यामध्ये स्वतःसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तीसाठी गुंतवणूक करू शकता. तसेच कुणीही दोन लोक एकत्र गुंतवणूक करू शकतात आणि तिसर्‍या पर्यायामध्ये दोन लोक एकत्र गुंतवणूक करतात परंतु मॅच्युरिटीवर पैसे फक्त एका गुंतवणूकदाराला दिले जातात. (Post Office NSC Scheme)

किती करू शकता गुंतवणूक ?

पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये 6.8 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. या योजनेत रु. 100 च्या पटीत गुंतवणूक करता येते. एनपीएसमध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही.

करात मिळते सवलत –

NSC मध्ये गुंतवणूक केल्यास प्राप्तीकर कलम 80 सी नुसार प्रतिवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळते. जेथे करपात्र उत्पन्न असेल तर एकूण उत्पन्नातून रक्कम वजा केली जाते.

Web Title :- Post Office NSC Scheme | post office nsc scheme good interest and tax exemption available

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Maharashtra NCC | कौतुकास्पद! महाराष्ट्र एनसीसी ग्रुपने पटकावला मानाचा ‘प्रधानमंत्री बॅनर’

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 4874 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे पुन्हा 5000 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Rosewater Benefits | केवळ त्वचाच नव्हे, तर केसांसाठी सुद्धा चमत्कारापेक्षा कमी नाही गुलाब जल!

Iron Deficiency Symptoms | हात आणि पायांवर दिसू शकतात आयर्नच्या कमतरतेची अशी लक्षणे

The post Post Office NSC Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत चांगल्या व्याजासह मिळते करात सवलत, जाणून घ्या सविस्तर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article