Header

Pregnancy Care | गरोदरपणात ‘हे’ 5 पदार्थ चुकूनही खाऊ नये, अन्यथा होतील गंभीर परिणाम

Pregnancy Care | गरोदरपणात ‘हे’ 5 पदार्थ चुकूनही खाऊ नये, अन्यथा होतील गंभीर परिणाम

Pregnancy Care | pregnancy care eating these 5 things during pregnancy can increases the risk of miscarriagel

बहुजननामा ऑनलाईन टीम – आईपण म्हणजे महिलेचा अत्यंत सुखद आणि आयुष्यातील गोंडस असा प्रवास असतो. महिला गरोदर (Pregnancy Care) असताना ते डिलिव्हरी होईपर्यंत तिची अत्यंत नेटाने काळजी घेणं गरजेचं असतं. नऊ महिने तिला उठल्यापासून ते बसण्यापर्यंत, खाण्यापर्यंतच्या सर्व सवयी बदलून योग्य अशा सवयी लावणं गरजेचं असतं. तसेच पोटातील आपल्या बाळाला (Baby) कुठल्याही प्रकारचा धोका संभवू नये याबद्दल खूप महत्त्वाची काळजी (Pregnancy Care) घ्यावी लागते.

बाळ निरोगी राहण्यासाठी आईला सर्वप्रथम स्वतःची काळजी (Pregnancy Care) घेणे गरजेचं असतं. बाळाचं आरोग्य कसे चांगले राहील, याबद्दल प्रत्येक गोष्टीचा त्यांना विचार करणं महत्वाच असतं. तसेच गरोदरपणामध्ये (Pregnancy) लोह, कॅल्शियम, विटामिन, प्रोटीन इत्यादी तत्त्व शरीरात कमी पडू शकतात. त्यामुळे हे तत्व ज्या पदार्थांमध्ये असेल ते पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे गरजेचं असतं.

परंतु गर्भवती महिलेनं काही पदार्थ खाऊ नये. याबद्दल सुद्धा अनेक तज्ञांनी सांगितले आहे. गर्भवती महिलेसाठी काही पदार्थ धोकादायक असू शकतात. जेणेकरून भविष्यात गर्भपाताची (Miscarriage) घटना घडू शकते. जाणून घेऊयात गरोदरपणाच्या काळामध्ये नेमकं कोणते पदार्थ खाऊ नये.

1. पपई (Papaya):
गर्भवती महिलेने पपई खाण्याची पूर्णपणे टाळावी. गरोदरपणाच्या काळात पपई न खाण्याचा सल्ला डॉक्टर महिलांना देतात. विशेषतः जर पपई कच्ची असेल तर, ती अजिबात खाऊ नये. तसं बघायला गेलं तर कच्च्या पपईमध्ये नावाचा पपेन (Papain) नावाच तत्त्व असतं. ज्यामुळं गर्भात वाढणाऱ्या बाळाला जन्मजात दोष आणि अन्य प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच जन्मजात बाळाच्या जीवाला धोका उद्भवतो.

2. मासे (Fish) :
मासे आपला शरीरासाठी अत्यंत उत्तम मानले जातात. नियमित मासे खाल्यानं विटामिन डी (Vitamin D), प्रोटीन (Protein), ओमेगा फॅटी ऍसिड (Omega Fatty Acid), ईपीए (EPA) आणि डीचए (DHA) यांसारखे पोषक तत्व आपल्या शरीराला मिळतात. अनेकदा मासे अशुद्ध पाण्यातमध्ये राहिल्यामुळे आणि अनेक वन्य जीवांना खाल्ल्यामुळे माशांच्या शरीराचा पारा शिरतो.नहा पारा माशांच्या मास पेशीमध्ये जमा होतो. तसेच माशांना शिजवल्यानंतर सुद्धा हा पारा त्यांच्या शरीरातून बाहेर निघत नाही. त्यामुळं गर्भवती महिलांचा गर्भपात (Miscarriage) होण्याची शक्यता असते. त्यामुळे चुकूनही गरोदरपणात महिलांनी मासे खाऊ नये.

3. कच्ची अंडी (Egg) :
महिलांनी गरोदरपणात कच्ची अंडी खाऊ नये .गरोदरपणाच्या काळामध्ये जर कोणत्या महिलेने चुकून कच्चं अंड खाल्लं, तर तिला सैल्मोनेला संक्रमणाचा धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे मळमळ होणं, पोट दुखी, जुलाब आणि उलटी यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात.

4. तुळशीचं पान (Holy Basil Leaves) :
तुळशीची पानं अनेक रोगांवर औषध म्हणून मानली जातात. सर्दी, खोकला, कफ झाल्यावर अनेकदा आपण तुळशीचा चहा बनवून पितो. परंतु गरोदरपणाच्या काळामध्ये महिलांनी सर्दी, खोकला, कफ झाल्यावर सुद्धा तुळशीच्या पानाच सेवन करू नये. तुळशीच्या पानांमध्ये एस्ट्रोगोल नावाचा घटक असतो. त्यामुळे महिलांच्या शरीरातील गर्भपाताचा (Miscarriage) धोका अधिक वाढतो.

5. जास्त कॅलरी असणारे पदार्थ :
महिलांनी गरोदरपणाच्या काळात ज्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅलरी समाविष्ट असते, असे पदार्थ खाऊ नये. हे पदार्थ खाल्ल्याने महिलांचे वजन वाढते. पण त्याचबरोबर गरोदरपणामध्ये त्यांना अनेक प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्सला सामोरे जावे लागते. हेच कारण भविष्यात गर्भपाताचा धोका सुद्धा उद्भवू शकतो. म्हणून गर्भवती असताना महिलेने कमी शिजलेले मांस, सी-फूड, प्रक्रिया केलेले मांस, जास्ती तळलेले पदार्थ किंवा भाजलेली मास खाऊ नये.

Web Title :- Pregnancy Care | pregnancy care eating these 5 things during pregnancy can increases the risk of miscarriagel

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Gold Price Today | रू. 47,600 झाला 10 ग्रॅम सोन्याचा भाव, जाणून घ्या चांदीचा काय आहे दर

Post Office NSC Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत चांगल्या व्याजासह मिळते करात सवलत, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra NCC | कौतुकास्पद! महाराष्ट्र एनसीसी ग्रुपने पटकावला मानाचा ‘प्रधानमंत्री बॅनर’

The post Pregnancy Care | गरोदरपणात ‘हे’ 5 पदार्थ चुकूनही खाऊ नये, अन्यथा होतील गंभीर परिणाम appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article