Header

Pune Crime | ‘सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअर’मध्ये नोकरीला असल्याचे सांगून तरुणीला 24 लाखांना गंडा

Pune Crime | ‘सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअर’मध्ये नोकरीला असल्याचे सांगून तरुणीला 24 लाखांना गंडा

Pune Crime | Young woman allegedly paid Rs 24 lakh for employment in Central Ministry of Housing and Urban Affairs

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअरमध्ये (central ministry of housing and urban affairs) नोकरीला असल्याचे सांगून एकाने बनावट नाव सांगून लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीला तब्बल २४ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) निशांत रमेशचंद्र नंदवाणा Nishant Rameshchandra Nandwana (रा. किशनगंज, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बालेवाडी (Balewadi) येथे राहणार्‍या ३१ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला हिने विवाहासाठी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर नाव नोंदविले होते. तेथे निशांत नंदवाणा याने अधितांश शिवप्रकाश अग्निहोत्री या बनावट नावाने नाव नोंदविले होते. या संकेतस्थळावर त्यांची ओळख झाली. आरोपीने तो सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअरमध्ये नोकरीला असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ३० ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२१ दरम्यान वेगवेगळी कारणे सांगून एकूण २४ लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात (Pune Crime) आले. त्याबाबत चौकशी केल्यावर त्याचे नावही बनावट असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक माळेगावे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Young woman allegedly paid Rs 24 lakh for employment in Central Ministry of Housing and Urban Affairs

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

हे देखील वाचा

Supreme Court | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ झटका ! भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात रोड रोमियोचा भररस्त्यात धुडगुस ! महिलांच्या मांडीवर जाऊन बसणार्‍या दोघांना अटक

The post Pune Crime | ‘सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअर’मध्ये नोकरीला असल्याचे सांगून तरुणीला 24 लाखांना गंडा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article