Header

Pune Crime | पुण्यात मोबाईल आणून न दिल्याने मुलाच्या पोटात चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Crime | पुण्यात मोबाईल आणून न दिल्याने मुलाच्या पोटात चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Crime attempt to murder of 17 years old boy marketyard police station

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | मित्राकडून मोबाईल आणून दे, असे सांगितले असतानाही मोबाईल आणून न दिल्याने एकाने १७ वर्षाच्या मुलाच्या पोटात चाकूने भोसकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime)

याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी (Marketyard Police Station) संजय गोकुळ परदेशी Sanjay Gokul Pardeshi (वय ३८, रा. आनंदनगर झोपडपट्टी, मार्केटयार्ड) याला अटक केली आहे. या घटनेत पियुष दीपक शर्मा (वय १७) हा गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी आरोपीची आई मिना गोकुळ परदेशी (वय ६५) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मार्केटयार्ड येथील आनंदनगर झोपडपट्टीत सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय परदेशी हा फिर्यादीचा मुलगा आहे. फिर्यादी व त्यांचा नातू पियुष शर्मा हे घरात असताना आरोपी संजय परदेशी याने त्याचा मित्र बिल्ला शेख याच्याकडून त्याचा मोबाईल घेऊन ये, असे सांगितले. हे दोघेही मोबाईल आणायला गेले नाही म्हणून संजय याने रागाच्या भरात त्यांना शिवीगाळ करुन पियुष याच्या पोटामध्ये चाकूने भोसकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संजय परदेशी याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक मुंढे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | attempt to murder of 17 years old boy marketyard police station

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

हे देखील वाचा

The post Pune Crime | पुण्यात मोबाईल आणून न दिल्याने मुलाच्या पोटात चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article