Header

Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात रोड रोमियोचा भररस्त्यात धुडगुस ! महिलांच्या मांडीवर जाऊन बसणार्‍या दोघांना अटक

Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात रोड रोमियोचा भररस्त्यात धुडगुस ! महिलांच्या मांडीवर जाऊन बसणार्‍या दोघांना अटक

Pune Crime | Bharti Vidyapeeth Police Arrest Two in Molestation Case

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | रस्त्याने जाणार्‍या तरुणी, महिलांना शिट्ट्या वाजवणे, पाठलाग करुन प्रसंगी भररस्त्यात त्यांची छेड काढण्याचे (Molestation Case) प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. आता या रोड रोमियोची (Road Romiyo) मजल आणखीच वाढली असून चहा पित बसलेल्या महिलांच्या मांडीवर जाऊन बसण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) दोघांना अटक केली आहे. अमित इंद्र नाथ (वय ३०, रा. दत्तप्रसाद सोसायटी, आंबेगाव खु़) आणि लक्ष्मण रामबहादुर साहु (वय २७, रा. चंद्रागण सोसायटी, आंबेगाव बु़ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

याप्रकरणी शिवणे (Shivne) येथील एका ३० वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार आंबेगाव (Ambegaon) येथील आईसाहेब चहा विक्री स्टॉलसमोर २६ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व त्यांची मैत्रिण आईसाहेब चहा स्टॉल येथे चहा पित बसल्या होत्या.

तेव्हा आरोपी शिट्टया वाजवत तेथे आले. फिर्यादी या बसल्या असताना जाणून बाजून ते फिर्यादीच्या मांडीवर येऊन बसले व त्यांच्या पोटाला हात लावून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादीने त्याचा जाब विचारला असता आरोपीने शिवीगाळ करुन ढकलून देऊन मारण्याची धमकी (Pune Crime) दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक घोगरे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Bharti Vidyapeeth Police Arrest Two in Molestation Case

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 25,425 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Maharashtra State Cabinet | राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Pune Crime | अजित पवारांच्या नावाने 20 लाखाची खंडणी मागणाऱ्या आरोपीला जामीन

Pune Corporation | रस्त्याच्या डांबरीकरणासाठीच्या वर्गीकरणावरून भाजपच्या दोन पदाधिकार्‍यांमध्ये ‘ठिणगी’

Pune Corona Third Wave | ‘कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे, परंतू संपणार कधी हे अभ्यासाअंती सांगता येईल’ – महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2386 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Budget 2022 | बजेटनंतर स्वस्त होऊ शकतात AC आणि TV सारखे होम अप्लायंन्सेस, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

MP Rajanitai Patil | मुंडे बहीण-भावाच्या वादात तिसऱ्याचा लाभ, भाजप-राष्ट्रवादीच्या चढाओढीत काँग्रेसने मारली बाजी

The post Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात रोड रोमियोचा भररस्त्यात धुडगुस ! महिलांच्या मांडीवर जाऊन बसणार्‍या दोघांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article