Header

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंची सडेतोड भूमिका; म्हणाले – ‘शाळेत गणवेश घातलाच पाहिजे’

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंची सडेतोड भूमिका; म्हणाले – ‘शाळेत गणवेश घातलाच पाहिजे’

Aaditya Thackeray | aaditya thackeray says uniform is must for school karnataka hijab row shivsena

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Aaditya Thackeray | कर्नाटकातील (Karnataka) उडुपी येथील एका शासकीय महाविद्यालयात मुस्लिम तरुणींना ‘हिजाब’ परिधान करून वर्गात बसण्यापासून थांबवण्यात आलं. हिजाबच्या वादाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी भाजपविरोधात आंदोलनेही केली जात आहेत. दरम्यान या प्रकरणावरुन राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यावेळी ते मुंबईत (Mumbai) एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, ”विद्येच्या मंदिरात धार्मिक-राजकीय वाद होऊ नयेत असे सांगतानाच शाळेने निश्चित केलेला गणवेश मात्र घातलाच पाहिजे, अशी सडेतोड भूमिका त्यांनी मांडली आहे. तर, शाळा, कॉलेज, विद्यापीठे ही शिक्षणाची भूमी-विद्यालये असतात. त्यामुळे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांनी धार्मिक-राजकीय वाद निर्माण न करता अभ्यासावर, शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विद्यालयात दर्जेदार शिक्षण देणे हीच शिवसेनेची (Shiv Sena) भूमिका असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, कर्नाटकात हिजाब वाद चिघळला असल्याचे दिसत आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले आहे. कर्नाटकात या प्रकरणावरून जोरदार आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Web Title :- Aaditya Thackeray | aaditya thackeray says uniform is must for school karnataka hijab row shivsena

 

 

Ravi Rana | आमदार रवी राणांवर IPC 307 कलमान्वये FIR, राजकीय वाद चिघळला

PPF मध्ये अशाप्रकारे दुप्पट करू शकता गुंतवणूक, टॅक्स बचतीसह मिळेल चांगला रिटर्न; जाणून घ्या सर्वकाही

7th Pay Commission | कर्मचार्‍यांना मिळाली खुशखबर ! DA मध्ये झाली 3% ची वाढ, सरकारने केली घोषणा

Multibagger Stock | 4 रुपयांवरून रू. 2,439 वर पोहचला Tata Group चा हा शेयर, गुंतवणुकदारांच्या 1 लाखाचे केले रू. 5.70 कोटी, तुमच्याकडे आहे का?

Gangster Sharad Mohol | गँगस्टर शरद मोहोळ टोळीचा म्हाळुंगेमधील राधा चौकात ‘राडा’ ! वाहनांवर दगडफेक करुन फोडल्या काचा, दहशत पसरविण्याचा प्रयत्न

The post Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंची सडेतोड भूमिका; म्हणाले – ‘शाळेत गणवेश घातलाच पाहिजे’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article