Header

Nitesh Narayan Rane | नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल ! दिशा सालियानबाबतच्या वादग्रस्त विधानामुळं FIR

Nitesh Narayan Rane | नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल ! दिशा सालियानबाबतच्या वादग्रस्त विधानामुळं FIR

Nitesh Narayan Rane disha salian family filed fir against narayan rane and nitesh rane

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Nitesh Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी (Disha Salian Family) राणे पिता – पुत्राविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल (Filed FIR) करण्यात आला आहे. दिशा सालियनवर बलात्कार (Rape) करुन तिची हत्या (Murder) करण्यात आली होती, असा दावा गेल्या आठवड्यात नारायण राणे यांनी केला होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी राणेंकडून दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मालवणी पोलीस ठाण्यात (Malvani police station) राणे पित्रा – पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nitesh Narayan Rane)

दिशा सालियनवर बलात्कार करुन तिची हत्या झाली आहे. ती गरोदरही (Pregnant) होती, असा दावा नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यावर दिशाच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत, आक्षेप घेतला होता. राणेंमुळे आपल्या मुलीची बदनामी (Defamation) होत आहे, त्यांनी तिची बदनामी करणं थांबवावं, असं आवाहन सालियन कुटुंबीयांनी केलं होत. (Nitesh Narayan Rane)

महिला आयोगाला रिपोर्ट सादर
पोलिसांचा महिला आयोगाला रिपोर्ट सादर झाल्यानंतर रात्री 12 वाजता मालवणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या अहवालात दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टममध्ये (Postmortem) तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ती गरोदर नव्हती असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी महिला आयोगाला यासंदर्भात अहवाल दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात लाखोंच्या संख्येने निर्माण करण्यात आलेल्या बोगस ट्विटर हँण्डलची देखील चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

 

मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशाच्या आई – वडिलांनी या बाबत दिशाच्या मृत्यूसंदर्भात खोटी व बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी. तसेच दिशाबद्दल समाजमाध्यमावर नमूद असलेली चुकीची व बदनामीकारक माहिती काढून टाकण्यात यावी अशी तक्रार आई वसंती सालियन (Vasanti Salian) व वडील सतीश सालियन (Satish Salian) यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे (Maharashtra State Women’s Commission) केली आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूबाबत कोणतेही पुरावे नसताना राणे यांनी तिच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी दिशाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Web Title :-  Nitesh Narayan Rane | disha salian family filed fir against narayan rane and nitesh rane

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा


Pune Crime | येरवडा कारागृहात जेल पोलीसाचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; ससूनमध्ये उपचार सुरू

Weight Loss Hacks | तांदूळ शिजवताना पातेल्यात एक चमचा टाका ‘ही’ गोष्ट, आपोआप कमी होईल पूण शरीरातील चरबी

IPS Rashmi Shukla | तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शक्ला यांच्यावर पुण्यात टेलिग्राफ अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती

Avoid These 6 Foods in Lunch | सावधान ! लंचमध्ये चुकूनही घेऊ नका ‘या’ 6 गोष्टी, सेवन केल्याने येतो आळस; आजारी सुद्धा पडू शकता

The post Nitesh Narayan Rane | नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल ! दिशा सालियानबाबतच्या वादग्रस्त विधानामुळं FIR appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article