Header

Pune Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंधाला पोटचा 13 वर्षाचा मुलगा ठरत होता अडथळा, परकरच्या नाडीने आईने आवळला गळा

Pune Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंधाला पोटचा 13 वर्षाचा मुलगा ठरत होता अडथळा, परकरच्या नाडीने आईने आवळला गळा

Pune Crime mother-killed-his-own-13 years old child by rope wrapped around neck over immoral relationship in junnar of pune district

पुणे / जुन्नर : बहुजननामा ऑनलाईन – जन्मदात्या आईनेच मुलाचा गळा आवळून खून (Mother Killed Child) केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) जुन्नर तालुक्यात (Junnar Taluka) घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक कारण समोर आलं. ज्या कारणासाठी आईने मुलाचा गळा आवळून खून (Pune Crime) केला ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) जुन्नर तालुक्यातील येडगाव जवळच्या परिसरात ही घटना घडली आहे. विद्या कदम (Vidya Kadam) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. 20 जानेवारी 2022 रोजी पहाटे 4.30 च्या सुमारास राहत्या घरी महिलेने आपल्या 13 वर्षाच्या मुलाचा गळा आवळला. महिलेने परकरच्या नाडीने (Rope) गळा आवळून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलगा झोपेत होता. गळा आवळल्याने मुलगा तडफडू लागला.

स्वत:च मुलाला रुग्णालयात केले दाखल
मुलगा तडफडू लागल्याने त्याला सुरुवातीला नारायणगाव (Narayangaon) येथे खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) हलवण्यात आले. उपचारादरम्यान 27 जानेवारी 2022 रोजी 7 दिवसांनी मुलाचा मृत्यू झाला. याबाबत विद्या कदम हिने ससून रुग्णालयात खोटे कारण सांगत घडलेली माहिती लपवली आणि मुलाचा अंत्यविधी केला.

पोलिसांना आला घातपाताचा संशय
मृत मुलाचे कागदपत्रे पोलिस ठाण्याला प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मुलाचा घातपात झाल्याचा संशय आला.
पोलिसांना संशय आल्याने विद्या कदमला चौकशीसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनला (Narayangaon Police Station) बोलावले होते.
मात्र, तिने उडवा उडवीची तसेच असमाधानकारक उत्तरे दिली.

पोलिसांच्या चौकशीत विद्या कदम यांच्या बोलण्यात विसंगती आल्याने ती काहीतरी लपवत असल्याचा संशय आला.
तिच्याकडे सखोल चौकशी केली त्यावेळी तिने अनैतिक संबंधाला (Immoral Relationship) अडथळा ठरत असल्याने
मुलाचा परकरच्या नाडीने गळा आवळून खून (Murder In Pune) केल्याची कबुली दिली.
नारायणगाव पोलीस ठाण्याच मुलाचे वडील सचिन शंकर कदम यांनी 17 फेब्रुवारी 2022 रोजी याप्रकरणी फिर्य़ाद दिली.
पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे (API Prithviraj Tate) पुढील तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | mother killed his own 13 years old child by rope wrapped around neck over immoral relationship in junnar of pune district

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा


Case Against Sameer Wankhede | एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना मोठा झटका ! कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | 24 कॅरेटचे सोने देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक

Chitra Wagh | ‘महाराज असते तर कडेलोट केला असता या सरकारचा’; भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याने शिवसेनेच्या आमदाराची भाऊजयला मारहाण !

Multibagger Penny Stock | 10 पैशांवरून 590.45 रुपयांवर पोहचला ‘हा’ शेयर, दिला 5 लाख टक्के जबरदस्त रिटर्न, 1 लाख रुपयांचे झाले 59 कोटी

The post Pune Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंधाला पोटचा 13 वर्षाचा मुलगा ठरत होता अडथळा, परकरच्या नाडीने आईने आवळला गळा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article