Pune Crime | कोथरूडमधील 23 वर्षीय तरूणाने बनवले कर्वेनगरमधील 21 वर्षीय तरूणीचे इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट; अश्लिल मेसेज नातेवाईकांना पाठवून विनयभंग

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | कर्वेनगरमधील 21 वर्षीय तरुणीच्या नातेवाईकांना तिच्याच नावाच्या बनावट इंस्टाग्राम अकाऊंटवरून (Fake Instagram Account) आक्षेपार्ह मेसेज (Obejctional Message) येत होते. सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) त्याची चौकशी केल्यावर तिच्याच कंपनीत काम करणार्या कोथरूडमधील 23 वर्षीय तरूणाने हे कृत्य करीत असल्याचे आढळून आले. अलंकार पोलिसांनी (Alankar Police) या तरुणाला अटक केली आहे. (Pune Crime)
जयमीन रितेश चावडा Jaymeen Riteish Chawda (वय २३, रा. बेलकेनगर, कोथरुड – Kothrud) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime) याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका कंपनीत काम करत आहे.
तिच्या कंपनीत काम करणारा जयमीन चावडा याने इंस्टाग्रामवर (Instagram Account) फिर्यादीच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केले. लैगिक उद्देशाने फिर्यादीचा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठलाग करुन तिची बदनामी होईल, अशा प्रकारचे अश्लिल व आक्षेपार्ह मेसेज फिर्यादीच्या नातेवाईकांना पाठवून फिर्यादीचा विनयभंग (Molestation Case) केला.
हा प्रकार ९ व १० फेब्रुवारी रोजी घडला होता. फिर्यादीला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) तक्रार केली होती (Pune Cyber Crime). त्याचा तपास केल्यावर हा सर्व प्रकार त्यांच्याच कंपनीत काम करीत असलेला जयमीन चावडा करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | A 23 year old man from Kothrud created a fake account on Instagram of a 21 year old girl from Karvenagar Sending obscene messages to her relatives Pune Cyber Crime Pune Police
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Mohit Kamboj | ‘संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी युतीत विष कालवलं’
The post Pune Crime | कोथरूडमधील 23 वर्षीय तरूणाने बनवले कर्वेनगरमधील 21 वर्षीय तरूणीचे इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट; अश्लिल मेसेज नातेवाईकांना पाठवून विनयभंग appeared first on बहुजननामा.