Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात न्याय मिळवून देण्याच्या आमिषाने 64 वर्षीय वकिलाकडून 38 वर्षीय महिलेवर बलात्कार

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | न्यायालयातील सगळ्या केसेस (Court Cases) चालवून न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका वकिलाने (Lawyer) 38 वर्षीय महिलेवर बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. 38 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार अॅड. नंदकुमार डिकोजी पाटील Adv. Nandkumar Dikoji Patil (वय-64 रा. रिमझिम बंगला, विजयनगर कॉलनी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वकिलाने 2013 पासून आतापर्यंत वेळोवेळी अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे आणि तिच्या पतीचे पटत नसल्याने मागील काही वर्षापासून त्या एकट्या राहतात. तर आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन न्यायालयातील सर्व केस चालवितो व न्याय मिळवून देतो असे आमिष पीडित महिलेला दाखवले.
यानंतर फिर्यादी महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने, वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवल्याचे पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याशिवाय फिर्यादी महिलेच्या पाठीमागे कुटुंबीय नसल्याचे पाहून आरोपीने तिला शारीरिक व
मानसिक त्रास (Mental Distress) दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपी वकिल नंदकुमार पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | 64 year old lawyer sexually assaulted a 38 year old woman in a bid to get justice pune crime news
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
The post Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात न्याय मिळवून देण्याच्या आमिषाने 64 वर्षीय वकिलाकडून 38 वर्षीय महिलेवर बलात्कार appeared first on बहुजननामा.