Header

Pune Crime | बेकायदा सावकारी करणार्‍या स्वप्नील कांचनवर जमीन हडपल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

Pune Crime | बेकायदा सावकारी करणार्‍या स्वप्नील कांचनवर जमीन हडपल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

Pune Crime | Another case has been registered against Swapnil Kanchan for illegally lending land

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | व्याजाने दिलेल्या ७ लाखांच्या रुपयांच्या व्याजाच्या मोबदल्यात जबरदस्तीने १८ गुंठे जमीन नावावर करुन घेणार्‍या स्वप्नील कांचन (Swapnil Kanchan) टोळीने आणखी एका शेतकर्‍याची २० आर जमीन बळकावल्याचा (Land Grabbing) प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Lonikalbhor Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

स्वप्नील राजाराम कांचन Swapnil Rajaram Kanchan (रा. उरुळी कांचन – Uruli Kanchan) व त्याच्या दोन ते तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जगदीश जालिंदर महाडिक Jagdish Jalindar Mahadik (वय ३३, रा. खेडेकर मळा, शिंदवणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २० ऑक्टोबर २०१५ पासून आतापर्यंत घडला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील कांचन याने फिर्यादी यांना १५ लाख रुपये ३ टक्के व्याजाने दिले होते. त्यापोटी शिंदवणे गट नं. २७ मधील २० आर क्षेत्र खरेदी खत पलटवून देण्याचे अटीवर खरेदी करुन घेतले होते. त्या पोटी फिर्यादीकडून आतापर्यंत महिन्याला ४५ हजार रुपये असे ६३ महिने एकूण २० लाख ३५ हजार रुपये घेतले.

तसेच काही महिने व्याज न दिल्याने त्या पोटी ३३ लाख रुपये चेक व आरटीजीएस द्वारे घेतले.
खोटे शपथपत्र बनवून त्यावर फिर्यादीकडून दमदाटी करुन सही घेतली. फिर्यादी यांनी घेतलेले १५ लाख व व्याज असे एकूण ७६ लाख ३५ हजार रुपये घेतले. तरीही खरेदी खत पलटवून दिले नाही. त्याबाबत फिर्यादी यांनी विचारले असता त्यांना व घरातील लोकांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या जमिनीवर ताबा घेतला आहे.

स्वप्नील कांचन याच्या दहशतीमुळे ते इतके दिवस घाबरुन होते. पोलिसांनी एका प्रकरणात स्वप्नील कांचन याला अटक केल्यामुळे आता महाडिक हे तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत.

Web Title :- Pune Crime | Another case has been registered against Swapnil Kanchan for illegally lending land

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

LPG Cylinder Rate | ‘एलपीजी’ सिलेंडरच्या दरात आज वाढ झाली की घट, जाणून घ्या 1 फेब्रुवारी ‘बजेट- डे’च्या दिवशी नवीन दर

Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दर महिना 5000 रुपयाची करा गुंतवणूक, जाणून घ्या किती मिळेल फंड आणि फायदा

Menstrual Pain Home Remedies | मासिक पाळी दरम्यानच्या वेदनांमुळं त्रस्त झाला आहात? तर जाणून घ्या काही खास टिप्स

The post Pune Crime | बेकायदा सावकारी करणार्‍या स्वप्नील कांचनवर जमीन हडपल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article