Header

Pune Crime | फरशी साफ करण्याचे लिक्वीड पाजून विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न; कोंढव्यातील खळबळजनक घटना

Pune Crime | फरशी साफ करण्याचे लिक्वीड पाजून विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न; कोंढव्यातील खळबळजनक घटना

Pune Crime | Attempt to kill a married woman by spraying liquid to clean the floor Sensational incident in Kondhwa

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | खरेदी केलेल्या फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन येत नाही, या कारणावरुन विवाहितेला जबरदस्तीने फरशी साफ करण्याचे लिक्वीड पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

याप्रकरणी हडपसरमधील सय्यदनगर (Sayyed Nagar Hadapsar) येथे राहणार्‍या एका २३ वर्षाच्या विवाहितेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती रेहान काझी, सासू नजमा काझी, नंणद गजाला काझी व हिना शेख यांच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हांडेवाडी रोडवरील किंगस्टन सिरीन या सोसायटीत १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडला होता. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पती, सासू, नंणदसह हांडेवाडी (Handewadi) येथे रहात होत्या. रेहान काझी याने फ्लॅट खरेदी केला आहे.
या फ्लॅटचे कर्ज (Home Loan) फेडण्यासाठी तो व त्याचे घरचे फिर्यादी यांनी माहेरहून २ लाख रुपये आणावेत, अशी मागणी करुन तिचा छळ करीत होते.

तिने माहेरहून पैसे न आणल्याने त्यांनी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सर्वांनी मिळून सवेरा कंपनीचे फरशी साफ करण्याचे लिक्वीड फिर्यादी यांना जबरदस्तीने पाजून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला. या घटनेनंतर तिने उपचार घेतल्यानंतर आता कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Attempt to kill a married woman by spraying liquid to clean the floor Sensational incident in Kondhwa

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

7th Pay Commission DA Hike | केंद्रीय कर्मचार्‍यांचा 14% वाढणार DA, झाले कन्फर्म ! इतकी वाढेल सॅलरी

Pune Crime | चारित्र्याचा संशय घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या पती सतीश रेणूसेसह तिघांना अटक; आंबेगाव खुर्द येथील घटना

Pune Crime | पुण्यात अवैध धंदे चालु देण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी-अंमलदार Protection Money स्वरूपात पैसे स्विकारताहेत; अति वरिष्ठांनी करून दिली मुंबईतील व.पो.नि. विरूध्दच्या खंडणीच्या गुन्ह्याची आठवण

The post Pune Crime | फरशी साफ करण्याचे लिक्वीड पाजून विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न; कोंढव्यातील खळबळजनक घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article