Header

Pune Crime | ‘गणेश पेठेचा भाई आहे’ म्हणत तडीपार गुन्हेगाराचा ‘राडा’; भर रस्त्यात महिलेचा विनयभंग करुन पसरविली दहशत

Pune Crime | ‘गणेश पेठेचा भाई आहे’ म्हणत तडीपार गुन्हेगाराचा ‘राडा’; भर रस्त्यात महिलेचा विनयभंग करुन पसरविली दहशत

Pune Crime | Panic spread by molesting a woman in the street of ganesh peth

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पोलिसांच्या रेकॉर्डवरील व तडीपार गुन्हेगाराने (Pune Criminals) ‘मी गणेश पेठेचा भाई आहे, मला पोलिसांची भिती दाखवू नका नाही तर एकेएकाला कोयत्याने खल्लास करुन टाकील’, अशी धमकी देत भर रस्त्यात महिलेचा विनयभंग (Molestation Case) केला. (Pune Crime)

संदीप कमलाकर चव्हाण Sandeep Kamlakar Chavan (वय ४२, रा. गणेश पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. हा प्रकार गणेश पेठेतील (Ganesh Pethe) सादडी सदनजवळ सोमवारी रात्री आठ वाजता घडला. याप्रकरणी एका ४६ वर्षाच्या महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सासरे हे त्यांच्या दुकानाच्या ओट्यावर बसले होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या सासर्‍यांनी पोलिसांकडे (Pune Police) तक्रार केली, अशी समजूत करुन घेऊन संदीप चव्हाण याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी यांनी विचारले असताना त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

त्याला समजाविण्यास फिर्यादी यांची चुलत सासू गेली असताना त्यांना कोयत्याने धमकाविले. कोयता हवेत फिरवून ‘मी गणेश पेठेचा भाई आहे. मला पोलिसांची भिती दाखवू नका, नाही तर एकएकाला कोयत्याने खल्लास करुन टाकीन’, असे मोठमोठ्याने ओरडून दहशत पसरविली. त्यामुळे आजू बाजूचे लोक व मुले पळून गेली. (Pune Crime)

संदीप चव्हाण याला परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्तांनी यापूर्वी तडीपार केले होते.
सहायक पोलीस निरीक्षक शेटे (API Shete) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Panic spread by molesting a woman in the street of ganesh peth

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Bappi Lahiri Passes Away | ‘गोल्डमॅन’ बप्पी लाहिरी यांचे 70 व्या वर्षी निधन

Nandurbar Police | शेणखाताच्या गाडीतून देशी-विदेशी दारुची वाहतूक, नंदुरबार पोलिसांकडून 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nandurbar Police | मौजमजेसाठी विद्यार्थ्यांनी चोरले आश्रमशाळेतील लॅपटॉप; नंदुरबार पोलिसांकडून 48 तासात गुन्हा उघडकीस, 22 लॅपटॉप जप्त

The post Pune Crime | ‘गणेश पेठेचा भाई आहे’ म्हणत तडीपार गुन्हेगाराचा ‘राडा’; भर रस्त्यात महिलेचा विनयभंग करुन पसरविली दहशत appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article