Header

Pune Crime | विश्रांतवाडीत ‘खुलेआम’ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस उपायुक्तांच्या विशेष पथकाचा छापा

Pune Crime | विश्रांतवाडीत ‘खुलेआम’ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस उपायुक्तांच्या विशेष पथकाचा छापा

Pune Crime | Special team of Deputy Commissioner of Police Rohidas Pawar raids gambling den in Vishrantwadi are

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | शहरात अवैध धंदे (Illegal Trades In Pune) बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून विश्रांतवाडी (Vishrantwadi) येथील वज्रेश्वरी मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत जुगार अड्डा (Gambling Den) सुरु असल्याचे आढळून आले. परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांच्या कार्यालयातील विशेष पथकाने येथे शुक्रवारी रात्री छापा घालून चौघा जणांना पकडले. (Pune Crime)

मनीष हरिश्चंद्र नरे (वय 32, रा. चर्‍होली), रफिक मगदूम शेख (वय 50, रा. शांतीनगर वसाहत, भोसरी), चेतन सुखदेव शेलार (वय 24, रा. विश्रांतवाडी) आणि बंटी ऊर्फ सुरज त्रिवेणी मिश्रा (वय 35, रा. विश्रांतवाडी) अशी गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस अंमलदार शाम कारभारी शिंदे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात कोणतेही अवैध धंदे सुरु (Illegal Business In Pune) असता कामा नये, असे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) आणि सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve) यांनी दिले आहेत.

तसेच सर्व परिमंडळांच्या पोलीस उपायुक्तांना (All DCP’s In Pune) त्यांनी त्यांच्या हद्दीत कोणतेही अवैध धंदे सुरु राहणार नाहीत. कोठे सुरु असल्याचे आढळून आल्यावर त्यावर कारवाई (Pune Police Action) करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार परिमंडळ 4 च्या हद्दीत विशेष पथकामार्फत (Pune Police Special Squads) कारवाई करण्यात येत आहे.

विश्रांतवाडी येथील वज्रेश्वरी मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत आडोशाला जुगार अड्डा (Gambling Den In Pune) सुरु असल्याची माहिती या विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी सर्वे नंबर 112 येथे पोलिसांनी छापा घालून जुगार खेळणार्‍या चौघांना पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व 3 हजार 100 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लहु सातपुते (PSI Lahu Satpute) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Special team of Deputy Commissioner of Police Rohidas Pawar raids gambling den in Vishrantwadi are

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Turmeric For Sugar Control | शुगर कंट्रोल करतो हळदीचा चहा, जाणून घ्या कसा करावा वापर

Cinnamon and Honey Benefits | मध आणि दालचीनीचे मिश्रण आरोग्यासाठी अतिशय लाभदायक; जाणून घ्या

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात न्याय मिळवून देण्याच्या आमिषाने 64 वर्षीय वकिलाकडून 38 वर्षीय महिलेवर बलात्कार

The post Pune Crime | विश्रांतवाडीत ‘खुलेआम’ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस उपायुक्तांच्या विशेष पथकाचा छापा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article