Header

Pune Crime | चारित्र्याचा संशय घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या पती सतीश रेणूसेसह तिघांना अटक; आंबेगाव खुर्द येथील घटना

Pune Crime | चारित्र्याचा संशय घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या पती सतीश रेणूसेसह तिघांना अटक; आंबेगाव खुर्द येथील घटना

Pune Crime | Three arrested including husband Satish Renuse for inciting suicide on suspicion of adultery Incident at Ambegaon Khurd

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | चारित्र्याचा संशय घेऊन शारिरीक व मानसिक त्रास देऊन आत्महत्या (Suicide In Pune) करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) पतीसह तिघांना अटक केली आहे. (Pune Crime)

पती सतीश माखाजी रेणूसे Satish Makhaji Renuse (वय ३४, रा. महालक्ष्मी दर्शन, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द), दीर संतोष माखाजी रेणूसे Santosh Makhaji Renuse (वय ४०), नणंद शितल चंद्रकांत इंगूळकर Shital Chandrakant Ingulkar (वय ४५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सीमा सतीश रेणूसे Seema Satish Renuse (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे (Married Woman Suicide In Pune) नाव आहे. ही घटना आंबेगाव खुर्द (Ambegaon Khurd) येथील महालक्ष्मी दर्शन अपार्टमेंटमध्ये २६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडली. (Pune Crime)

याप्रकरणी सीमा हिचा भाऊ जय बाजीराव मळेकर (वय १९, रा. केडगाव, जि. अहमदनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सीमा रेणूसे हिला कौटुंबिक कारणावरुन शारिरीक व मानसिक त्रास (Domestic Violence) देऊन तिला घालून पाडून बोलण्यात येत होते. तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन सतीश रेणूसे हा सीमा हिच्याशी वारंवार भांडणे करुन मारहाण करीत असे.

सासरी होणार्‍या या छळाला कंटाळून सीमा हिने महालक्ष्मी दर्शन अपार्टमेंट येथील घरात २६ फेब्रुवारी रोजी दुपारी आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Three arrested including husband Satish Renuse for inciting suicide on suspicion of adultery Incident at Ambegaon Khurd

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | पुण्यात अवैध धंदे चालु देण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी-अंमलदार Protection Money स्वरूपात पैसे स्विकारताहेत; अति वरिष्ठांनी करून दिली मुंबईतील व.पो.नि. विरूध्दच्या खंडणीच्या गुन्ह्याची आठवण

Bad Habits | विषासमान आहेत तुमच्या सकाळीच्या ‘या’ 5 सवयी, लवकर बदला; अन्यथा होऊ शकता त्रस्त

Burning Bus In Pune | वाढदिवसापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे ! आग विझवताना कोथरुड अग्निशमन दलाचे अधिकारी गंभीर जखमी; गजानन पाथरुडकर ICU मध्ये

The post Pune Crime | चारित्र्याचा संशय घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या पती सतीश रेणूसेसह तिघांना अटक; आंबेगाव खुर्द येथील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article