Header

Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, खून प्रकरणी संजय काटकरला फाशीची शिक्षा; पुणे कोर्टाने सुनावली शिक्षा

Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, खून प्रकरणी संजय काटकरला फाशीची शिक्षा; पुणे कोर्टाने सुनावली शिक्षा

Pune Crime | Sanjay Katkar sentenced to death for murder of a two and a half year old girl in Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन (नितीन पाटील) – Pune Crime | अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण (Kidnapping) करुन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) करुन खून (Murder In Pune) केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात फेब्रुवारी 2021 मध्ये घडली होती. या गुन्ह्यातील नराधमाला सोमवारी (दि.28 फेब्रुवारी) जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख (District Sessions Judge S. A. Deshmukh) यांनी फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावली आहे. हा प्रकार पुणे ग्रामिण पोलीस (Pune Rural Police) दलातील वेल्हे पोलीस ठाण्याच्या (Velha Police Station) हद्दीत घडला होता. संजय बबन काटकर Sanjay Baban Katkar (वय-28 रा. कादवे, ता.वेल्हा) असे फाशी झालेल्या आरोपीचे नाव आहे. अशी माहिती सरकारी वकील विलास पठारे (Vilas Pathare) यांनी दिली. (Pune Crime)

अधिक माहिती अशी की, 15 फेब्रुवारी 2021 रोजी पुणे जिल्ह्यातील कुरण खुर्द गावात घरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. वेल्हे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी मुलीचा शोध घेत होते. दरम्यान, हवेली तालुक्यालीत (Haveli Taluka) मालखेड थोपटेवाडी रस्त्यावरील एका पुलाखाली चिमुरडीचा मृतदेह (Dead Body) पोलिसांना सापडला. अहवालातून चिमुरडीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके तैनात केली.

आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना हा गुन्हा संजय बबन काटकर याने केला असून तो रायगड जिल्ह्यातील (Raigad District) नाटे येथील एका वीटभट्टीवर लपून बसल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. ग्रामीण पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक (Arrested) केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध अपहरण, बलात्कार, पॉक्सो, खून यासह इतर गुन्हे दाखल केले. (Pune Crime)

या गुन्ह्यात न्यायालयात (Court) आरोपपत्र दाखल झाल्यानंतर वर्षभरात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणात एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले. तसेच प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष यामध्ये महत्त्वाची ठरली. या प्रकरणाची अधिक माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) हे आज (मंगळवारी दि.1 मार्च) पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title :- Pune Crime | Sanjay Katkar sentenced to death for murder of a two and a half year old girl in Pune

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 51 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

PM Kisan योजनेचे 6000 रुपये मिळत नसतील तर करा ‘हे’ सोपे काम, मिळू लागतील पैसे! जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

Sambhaji Raje Chhatrapati | संभाजीराजेंचं उपोषण मागे, मागण्या मान्य झाल्याचं जाहीर (व्हिडिओ)

The post Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, खून प्रकरणी संजय काटकरला फाशीची शिक्षा; पुणे कोर्टाने सुनावली शिक्षा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article