Header

Pune Crime | पुण्यातील ‘मटका किंग’ संजय पाटोळेचा डोक्यात गोळी झाडून खून; शिरवळमध्ये प्रचंड खळबळ

Pune Crime | पुण्यातील ‘मटका किंग’ संजय पाटोळेचा डोक्यात गोळी झाडून खून; शिरवळमध्ये प्रचंड खळबळ

Pune Crime Murder Of Matka King Sanjay Subhash Patole at Shirval Satara

पुणे / सातारा : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पुण्यातील कात्रज (Katraj) परिसरातील मटका व्यवसायिकाच्या (Matka King) डोक्यात गोळी झाडून खून (Murder In Shirval) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संजय सुभाष पाटोळे Sanjay Subhash Patole (वय ३६, रा. बिबवेवाडी – Bibvewadi) असे खून झालेल्या मटका व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना खंडाळा (Khandala) तालुक्यातील शिरवळ (Shirval) येथील फुलमळा परिसरातील लेक पॅलेस या इमारतीच्या टेरेसवर रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime)

याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी (Shirval Police) एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय पाटोळे हा मटका किंग म्हणून प्रसिद्ध होता. तो कामासाठी बाहेर जात असल्याचे सांगून रविवारी सकाळी ७ वाजता पुण्यातील घरातून बाहेर पडला. त्याच्याबरोबर एक जण होता. त्यानंतर शिरवळ येथील लेक पॅलेस या इमारतीच्या टेरेसवर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक इमारतीत राहणारी एक महिला गेली. तेव्हा तेथे तिला एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. तिने हा प्रकार पतीला सांगितला. पतीने याची माहिती पोलिसांना कळविली. शिरवळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने (Police Inspector Navnath Madne) व त्यांच्या सहकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या खिशात आधार कार्ड (Aadhaar Card) आढळून आले. (Pune Crime)

त्यावरुन ती व्यक्ती संजय पाटोळे असून ती पुण्यातील मटका व्यावसायिक असल्याची माहिती समोर आली. या इमारतीच्या खालीच संजय पाटोळे याची गाडी उभी होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर त्याचे नातेवाईक शिरवळला पोहचले आहेत. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल (SP Ajaykumar Bansal) यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, लेक पॅलेस ही जुनी इमारत असून तेथे सर्व लोक रहायला आले आहेत.
संजय पाटोळे याची गाडी इमारतीच्या बाहेर पार्क केली होती. इमारतीमध्ये त्याच्या ओळखीचे कोणी नाही.
कोणीतरी त्याला इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेले. तेथे त्याच्यावर अगदी जवळून गावठी कट्ट्यातून गोळी झाडून त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासणीत दिसून येत आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title :- Pune Crime | Murder Of Matka King Sanjay Subhash Patole at Shirval Satara

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा


Mutual Fund SIP | दररोज गुंतवा 167 रुपये, निवृत्तीपुर्वी तुम्ही बनाल करोडपती, मिळतील 11.33 कोटी; जाणून घ्या

Urad Dal | ‘या’ डाळीचा करा दैनंदिन डाएटमध्ये समावेश; जाणून घ्या हृदयरोगापासून वाचण्याची सोपी पद्धत

Narayan Rane | पुन्हा एकदा नारायण राणे VS शिवसेना वाद पेटणार ! मालवण चिवला बीचवरील निलरत्न बंगल्यावर कारवाईचे आदेश?

The post Pune Crime | पुण्यातील ‘मटका किंग’ संजय पाटोळेचा डोक्यात गोळी झाडून खून; शिरवळमध्ये प्रचंड खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article