Header

Pune Crime | ‘मी इथला भाई आहे’ म्हणत सराईत गुंडाचा वारजे माळवाडीत ‘राडा’; तरुणावर कोयत्याने वार

Pune Crime | ‘मी इथला भाई आहे’ म्हणत सराईत गुंडाचा वारजे माळवाडीत ‘राडा’; तरुणावर कोयत्याने वार

Pune Crime | Attempt To Kill Incident In Warje Malwadi Area

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | ‘मी येथला भाई आहे,’ असे म्हणून कारमधून जाणार्‍या तरुणाला अडवून त्याच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन एका गुंडाला वारजे माळवाडीत (Warje Malwadi) भर रस्त्यावर राडा घातला. वारजे माळवाडी पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे.

शुभम अनिल सुद्देवार (वय २८, रा. चैतन्य चौक, पारगे बिल्डींग, वारजे) असे या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत नवनाथ साष्टे (रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

फिर्यादी व त्यांची पत्नी हे चारचाकी गाडीमधून सोमवारी रात्री आठ वाजता वारजे माळवाडीतील गोकुळनगर येथे जात होते. त्यावेळी शुभम सुद्देवार हा रस्त्यात आडवा उभा राहून त्याने फिर्यादीचा जाण्याचा रस्ता अडविला. तेव्हा फिर्यादी याला समजावून सांगत असताना त्याने शर्टच्या आत लपवलेला कोयता बाहेर काढला (Pune Crime). मी येथील भाई आहे, असे म्हणून फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गळ्यावरुन कोयता फिरविला. फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

जमलेल्या लोकांवर हातातील कोयता फिरवून दहशत निर्माण केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक होळकर (PSI Holkar) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Attempt To Kill Incident In Warje Malwadi Area

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Personal Finance | अवघे 3,000 रुपये वाचवून सुद्धा बनू शकता करोडपती, जाणून घ्या काय आहे कॅलक्युलेशन

Pune Water Supply | वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम; पुण्यासह पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा विस्कळीत

Tata Group चा ‘हा’ शेयर पुन्हा घेऊ लागला उसळी !

The post Pune Crime | ‘मी इथला भाई आहे’ म्हणत सराईत गुंडाचा वारजे माळवाडीत ‘राडा’; तरुणावर कोयत्याने वार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article