Header

Pune School Update | ‘पुण्यात पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार’ – अजित पवार (व्हिडीओ)

Pune School Update | ‘पुण्यात पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार’ – अजित पवार (व्हिडीओ)

Pune School Update | pune school class 1 to 8 standard will start full day said ncp leader and dycm ajit pawar

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune School Update | मागील काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना बाधितांची (Coronavirus) वाढणारी संख्या आता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे लावलेले निर्बंध देखील शिथिल करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुण्यातील शाळा, महाविद्यालये (Schools, Colleges) 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आल्या आहेत. तर, 1 ली ते 8 वीचे वर्ग (1st to 8th Class) चार तासच सुरू ठेवण्यात आले होते. आता पहिली ते आठवीचे वर्ग हे पूर्ण वेळ भरणार (Pune School Update) आहेत. याबाबत माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

पहिली ते आठवीचे वर्ग हे पूर्ण वेळ भरणार असल्याचा निर्णय पुण्यातील (Pune News) कोरोना स्थितीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ”1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा सुरू केल्या. पहिली ते आठवीचे वर्ग अर्ध वेळ भरवण्यात येत होत्या. पण आता पहिली ते आठवीचे वर्ग पण पूर्णवेळ भरवण्याचा निर्णय घेतला आहे.” (Pune School Update)

कोरोना परिस्थितीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ”जागतिक परिस्थिती पाहता नव्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. पण दैनंदिन कोविड मृतकांच्या संख्येत वाढ झाली आहे. या मागचं नक्की कारण डॉक्टरांकडून शोधण्याचं काम सुरू आहे. फ्रान्स आणि अमेरिकेत नव्या रुग्णसंख्येत घट होतेय, जर्मनीत वाढ होतेय तर आपल्या देशात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्येत 30 टक्क्यांनी घट झालीय. पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर, पुणे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येत 50 टक्क्यांनी घट झाली असल्याचं ते म्हणाले.”

Web Title :- Pune School Update | pune school class 1 to 8 standard will start full day said ncp leader and dycm ajit pawar

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Lata Mangeshkar Health Update | लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली, व्हेंटिलेटरवर हलवले; डॉक्टरांनी दिली माहिती

5 हजाराचा हप्ता घेणारा पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळयात

Pune NCP | बंडातात्या कराडकर यांच्या विधानाचा पुणे राष्ट्रवादीकडून ‘जोडे मारो’ आंदोलन करुन निषेध

Multibagger Stock | Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या ‘या’ मल्टीबॅगर शेयरमध्ये लागले अपर सर्किट, एक महिन्यात 95% वाढली किंमत

Cast India | कास्ट इंडिया : माध्यम क्षेत्रातील उद्योजक आणि सर्जनशील व्यावसायिक यांना एकत्र आणणारे स्टार्टअप व्यासपीठ

The post Pune School Update | ‘पुण्यात पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार’ – अजित पवार (व्हिडीओ) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article