Header

Tata Group चा ‘हा’ शेयर पुन्हा घेऊ लागला उसळी !

Tata Group चा ‘हा’ शेयर पुन्हा घेऊ लागला उसळी !

Tata Group | ttml share of tata group started flying again

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Group ची उपकंपनी टीटीएमएलचे शेअर्स (TTML Share) गेल्या 5 सत्रांपासून अपर सर्किटमध्ये आहेत. दुसरीकडे, या आधी 20 दिवस खरेदीदार मिळत नव्हते. शेअर 290.15 रुपयांवरून 141.75 रुपयांवर घसरला होता. आता पुन्हा एकदा हा स्टॉक वाढू लागला आहे आणि NSE वर तो रु. 164.00 वर पोहोचला आहे. त्याच वेळी, त्याची BSE वर किंमत आता 172.70 रुपये झाली आहे. (Tata Group)

11 जानेवारीपासून तो सतत लोअर सर्किटवर होता आणि या काळात कोणीही या शेअरमध्ये पैसे गुंतवायला तयार नव्हते आणि खरेदीदार नसल्यामुळे लोकांचे नुकसान थांबवता आले नाही. पण, एका बातमीनंतर, बाजार उघडताच, TTML ला अप्पर सर्किट लागले. TTML चा स्टॉक 11 जानेवारी रोजी 290.15 च्या सर्वकालीन उच्चांकावर बंद झाला. याआधी, एका वर्षात 2830 टक्के इतका रिटर्न दिला होता.

23 डिसेंबरपासून तो जवळजवळ दररोज अप्पर सर्किटला धडकत होता. 23 डिसेंबरला तो 154.10 रुपयांवर बंद झाला आणि 10 जानेवारीला 290.15 रुपयांवर पोहोचला. या कालावधीत गुंतवणूकदारांना 188 टक्के रिटर्न दिला. (Tata Group)

अचानक भाव का वाढू लागला
मंगळवारी टाटा टेलिसर्व्हिसेस लि. (TTSL) ने समायोजित सकल महसूल (एजीआर) थकबाकीवरील व्याज इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याची त्यांची योजना रद्द केली. अलीकडेच, टाटा टेलिसर्व्हिसेसने सरकारला द्यायची 850 कोटी रुपयांची व्याज देय रक्कम इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला होता, जी कंपनीतील 9.5 टक्के समभाग समतुल्य आहे. मात्र, आता कंपनीने हा प्लॅन रद्द केला आहे.

का लागत होते लोअर सर्किट?
टाटा टेलिसर्व्हिसेसने शेअर बाजाराला नुकत्याच दिलेल्या माहितीत म्हटले होते की, त्यांच्या मूल्यांकनानुसार, व्याजाचे निव्वळ वर्तमान मूल्य (NPV) सुमारे 850 कोटी रुपये आहे. व्याजाचे इक्विटीमध्ये रूपांतर केल्यास कंपनीतील सरकारचा हिस्सा 9.5 टक्के होईल.

दूर संचार विभागाने दिलेल्या माहितीतील गणना पद्धतीनुसार, 14 ऑगस्ट 2021 च्या प्रासंगिक तारखेनुसार कंपनीची सरासरी शेअर किंमत प्रति इक्विटी अंदाजे 41.50 रुपये आहे. तेव्हापासून या फ्लाईंग स्टॉकमध्ये विक्रीचा टप्पा सुरू झाला होता.

काय करते TTML?
TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी आहे. ही कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. कंपनी व्हॉईस, डेटा सेवा पुरवते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत. बाजारातील जाणकारांच्या मते, गेल्या महिन्यात कंपनीने स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा कंपन्यांसाठी सुरू केली आहे.

याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, कारण कंपन्यांना जलद इंटरनेट आणि ऑप्टिमाइज्ड नियंत्रणासह क्लाउड आधारित सुरक्षा सेवा मिळत आहेत. क्लाउड आधारित सुरक्षा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे डेटा सुरक्षित ठेवता येतो. जे व्यवसाय डिजिटल आधारावर चालत आहेत त्यांना या लीज लाइनमुळे मोठी मदत होणार आहे.

यामध्ये सर्व प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून सुरक्षितता अंतर्भूत करण्यात आली असून, त्यासोबतच वेगवान इंटरनेट सुविधाही देण्यात आली आहे.


डिस्क्लेमर :
(येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title :- Tata Group | ttml share of tata group started flying again

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Pune Crime | धक्कादायक! पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीची येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

Nitesh Rane | नितेश राणेंच्या अडचणीत वाढ ! संतोष परब यांच्या हल्ल्याची सुपारी दिली, वकिलांचा गंभीर आरोप

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘अजित पवार हेलिकॉप्टरने जमिनी शोधतात, आयुष्यभर फक्त जमिनी लाटण्याचं काम केलं’

The post Tata Group चा ‘हा’ शेयर पुन्हा घेऊ लागला उसळी ! appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article