Header

Diabetes Symptoms | अखेर डायबिटीजमध्ये पायांमध्ये का होतात वेदना? ‘या’ 3 टिप्समुळे मिळेल आराम; जाणून घ्या

Diabetes Symptoms | अखेर डायबिटीजमध्ये पायांमध्ये का होतात वेदना? ‘या’ 3 टिप्समुळे मिळेल आराम; जाणून घ्या

Diabetes Symptoms | why diabetes patient have pain in their feet blood sugar control tips

बहुजननामा ऑनलाइन टीम – Diabetes Symptoms | तुम्हाला माहीत आहे का मधुमेह रुग्णांचे (Diabetic Patients) पाय का दुखतात? खरे तर, पाय दुखण्याची समस्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सामान्य झाली आहे, परंतु त्यावर उपचार करणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा ही समस्या गंभीर आजाराचे रूप घेऊ शकते. जेव्हा ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) नियंत्रणात नसते, तेव्हा रक्त पोहचवणार्‍या कॅपेलरी डॅमेज (Capillary Damage) होतात. यामुळेच रुग्णांना पाय दुखण्याची समस्या उद्भवू शकते (Diabetes Symptoms).

या कारणांमुळे सुद्धा दुखतात पाय (These Reasons Also Cause Pain In Feet)
याशिवाय मधुमेही रुग्णांमध्ये वेदना झाल्यास स्नायू कमकुवत होणे, जळजळ होणे, युटीआयसह पाय दुखणे (Muscle Weakness, Inflammation, Leg pain, UTI) इत्यादी लक्षणे जाणवू शकतात. याशिवाय जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे मधुमेहाचे रुग्ण पाय दुखण्याची तक्रार करतात. इतकेच नाही तर काही वेळा इन्फेक्शनमुळे मधुमेहाचे रुग्ण पाय दुखण्याची तक्रार करू शकतात (Diabetes Symptoms).

डायबिटिजमध्ये पायदुखीवर उपाय ( Remedies For Foot Pain In Diabetes)

1. आहारात फळे आणि भाज्यांचा करा समावेश (Diet Includes Fruits And Vegetables)
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात धान्य (Grain), फळे आणि भाज्यांचा समावेश करा. याशिवाय दुग्धजन्य पदार्थांचे (Dairy Products) जास्त सेवन करू नये.

2. व्हिटॅमिन डी, बी 12 सेवन करा (Eat Vitamin D, B12)
मधुमेहामध्ये पाय दुखण्याची समस्या असेल तर व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12 घ्या. नसांना इजा होऊ नये म्हणून व्हिटॅमिन बी12 घेणे आवश्यक आहे, जर मज्जातंतूंमध्ये कमजोरी असेल तर हे जीवनसत्व घ्या, याशिवाय हाडांसाठी व्हिटॅमिन डी देखील घ्या.

3. मीठाच्या पाण्याने पाय धुवा (Epsom Salt Foot Soak)
कोमट पाण्यात मीठ मिसळून त्यात पाय बुडवून बसा, पाय दुखणे बरे होईल. मिठाच्या पाण्यात पाय भिजवल्याने सुजेची समस्याही दूर होते आणि वेदनाही कमी होतात.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Diabetes Symptoms | why diabetes patient have pain in their feet blood sugar control tips

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Oscars 2022 Winners List | समोर आली ‘Oscar 2022’ विजेत्यांची पूर्ण यादी, जाणून घ्या भारताच्या झोळीत काय पडलं ?

Lose Thigh Fat | मांड्यांवर वाढली असेल चरबी तर ‘या’ 5 एक्सरसाईजने करा कमी; जाणून घ्या

Gas Problem And Acidity | गॅसची समस्या झाल्यास चॉकलेट खावे का? अ‍ॅसिडिटी आणि कोको पावडरमध्ये जवळचा संबंध; जाणून घ्या

The post Diabetes Symptoms | अखेर डायबिटीजमध्ये पायांमध्ये का होतात वेदना? ‘या’ 3 टिप्समुळे मिळेल आराम; जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article