Header

LPG Price Hike | महागाईचा डबल अटॅक ! पेट्रोल-डिझेलने दिला जोरदार झटका, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ

LPG Price Hike | महागाईचा डबल अटॅक ! पेट्रोल-डिझेलने दिला जोरदार झटका, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ

LPG Price Hike | lpg price hike lpg domestic gas cylinders price hike by rs 50 per cylinder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LPG Price Hike | गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टीची शक्यता वर्तवली जात होती ती आज झाली आहे. देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Hike) आज वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरातील ही वाढ कच्च्या तेलातील वाढीमुळे आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 80 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. (LPG Price Hike)

आज सकाळी 6 वाजल्यापासून नवीन किंमती लागू झाल्या आहेत. आजपासून रोज किंमती वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. यापूर्वी 4 नोव्हेंबरला देशात इंधनाचे दर वाढले होते.

मुंबईत पेट्रोल 110.82 रू.
भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशनच्या लेटेस्ट अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 22 मार्च 2022 ला पेट्रोलचा दर 109.98 रूपये प्रति लीटरवरून वाढून 110.82 रूपये प्रति लीटरवर पोहचला आहे. तर डिझेलचा दर 95 रूपये प्रति लीटरवर पोहचला आहे.

दिल्लीत पेट्रोल 96.21 रू.
दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रूपये प्रति लीटरवरून वाढून 96.21 झाली आहे. तर डिझेलचा भाव 86.67 रूपये प्रति लीटरवरून महाग होऊन आता 87.47 रूपयांवर पोहचला आहे.

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रू.ची वाढ
तसेच घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात (LPG cylinder rate) 50 रूपयांची वाढ झाली आहे. नवीन किंमत आज मंगळवारपासून लागू झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरचा दर 6 ऑक्टोबर 2021 च्या नंतर वाढला आहे. आजपासून घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमती दिल्लीत 899.50 रूपयांवरून वाढून 949.50 रूपये झाली आहे.

Web Title :- LPG Price Hike | lpg price hike lpg domestic gas cylinders price hike by rs 50 per cylinder

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Petrol Diesel Price Hike | महागाईचा भडका ! 4 नोव्हेंबरनंतर पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत प्रथमच वाढ; जाणून घ्या पुण्यातील नवीन दर

How To Get Pink Lips Naturally | गुलाबी आणि चमकदार ओठांसाठी करा ‘हे’ प्रभावी 5 नैसर्गिक उपाय; जाणून घ्या

How To Get Rid Of Blackheads | सहजपणे मिळवू शकता ‘ब्लॅकहेड्स’पासून मुक्ती, केवळ करा ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या

The post LPG Price Hike | महागाईचा डबल अटॅक ! पेट्रोल-डिझेलने दिला जोरदार झटका, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article