Header

PMC Property Tax | झटपट आकारणी आणि वसुली ! पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाने वसूल केले 16 कोटी रुपये

PMC Property Tax | झटपट आकारणी आणि वसुली ! पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाने वसूल केले 16 कोटी रुपये

PMC Property Tax | Instant Charge and Recovery! Pune Municipal Corporation's property tax department collected Rs 16 crore manjri stud farm

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – महापालिकेच्या मिळकत कर (PMC Property Tax) आकारणी व कर संकलन विभागाने यंदा त्यांच्या कार्यशैलिची झलक दाखवत उत्पन्न ऐतिहासिक पातळीवर नेले आहे. आर्थिक वर्षाच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सकारात्मक आणि रचनात्मक काम करणाऱ्या मिळकत कर विभागाच्या टीमने (PMC Property Tax) आकारणी न झालेल्या मिळकतींची आकारणी आणि कर वसुली देखील करत अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही साध्य केल्याचे एक अनोखे उदाहरण समोर आले आहे. कर आकारणी न झालेल्या फुरसुंगी (Fursungi) येथील एका मोठ्या मिळकतीची आकारणी करून लगोलग तब्बल 16 कोटी रुपये कर जमादेखील करून घेतला. Pune Municipal Corporation (PMC)

फुरसुंगी येथील दि मांजरी स्टड फार्म (Manjri Stud Farm) प्रा.लि. या कंपनीच्या मिळकतीची आकारणी झालेली नव्हती. मिळकतकर विभागाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आवश्यक ती कार्यवाही करून या मिळकतीची आकारणी केली. या मिळकतीतून पालिकेला 16 कोटी रुपये कर मिळणार होता. (PMC Property Tax)

मिळकत कर विभागाचे प्रमुख सह आयुक्त विलास कानडे (PMC Vilas Kanade) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी रविंद्र धावरे, राजेश कामठे , प्रकाश वालगुडे यांचे नियोजनानुसार विभागीय निरीक्षक अरुण शिंदे व प्रकाश कदम, नीलेश पवार, विभागीय निरीक्षक यांचे सहकार्यातून पेठ निरीक्षक, रविंद्र गायकवाड, नवनाथ हरपळे, महादेव पुणेकर, मारुती चोरघडे आदींच्या पथकाने पाठपुरावा करून काल या मिळकतीचा 16 कोटी रुपयांचा कर जमा करून घेतला.

महापालिकेने यंदा सुमारे 1800 कोटी रुपये कर वसूल केला आहे. वाढीव बांधकामे, थकबाकी वसुली आणि नवीन आकारणीच्या माध्यमातून मागील वर्षभरात सकारात्मक आणि रचनात्मक काम करून मिळकत कर विभागाने पालिकेच्या उत्पन्नात अभूतपूर्व वाढ केल्याचे पाहायला मिळाले. सर्वसाधरण करामध्ये देण्यात आलेली 40 टक्के सूट मागील राज्य शासनाने रद्द केल्यानंतर कुठलीही करवाढ न करता महापालिकेचे मिळकत कराचे उत्पन्न वाढण्यासही हातभार लागल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title :- PMC Property Tax | Instant Charge and Recovery! Pune Municipal Corporation’s property tax department collected Rs 16 crore manjri stud farm

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Bad Breath Problem | तोंडाच्या दुर्गंधीपासून करायचा असेल बचाव तर ‘या’ गोष्टींपासून राहा दूर, असा मिळवा श्वासाचा ताजेपणा

White Hair Problem | पांढर्‍या केसांची समस्या मुळापासून होईल दूर, फक्त करा ‘हे’ 3 अचूक उपाय; जाणून घ्या

Datura Leaves Benefits | ‘या’ पानांचा वापर केल्याने गळणार नाहीत डोक्याचे केस, कुठेही दिसली तर तोडून आणा घरी; जाणून घ्या

The post PMC Property Tax | झटपट आकारणी आणि वसुली ! पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाने वसूल केले 16 कोटी रुपये appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article