Header

Pune Crime | धक्कादायक ! शिवाजीनगर परिसरातील शाळेत भरदिवसा घुसून 11 वर्षाच्या मुलीवर बाथरुममध्ये बलात्कार

Pune Crime | धक्कादायक ! शिवाजीनगर परिसरातील शाळेत भरदिवसा घुसून 11 वर्षाच्या मुलीवर बाथरुममध्ये बलात्कार

Pune Crime minor girl rape case shivaji nagar police station pune rape in school bathroom

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | ओळख असल्याचा बहाणा करुन ११ वर्षाच्या मुलीला शाळेच्या बाथरुममध्ये (Bathroom) नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शिवाजीनगर (Shivaji Nagar, Pune) परिसरातील एका मुलींच्या शाळेत बुधवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली.  

याप्रकरणी डेक्कन परिसरात राहणार्‍या एका ४० वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ११ वर्षाची मुलगी शाळेत गेली होती. यावेळी एक जण शाळेत आला व त्याने या मुलीशी ओळख असल्याचा बहाणा करुन तिला ढकलत ढकलत शाळेच्या बाथरुममध्ये नेले. तेथे तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला (Pune Crime). त्यानंतर बाहेर कुणाला काही सांगितलेस तर बघ अशी धमकी देऊन तेथून निघून गेला. (Rape In School Bathroom, Pune)

या घटनेनंतर या मुलीने आपल्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांच्या (Teacher) कानावर ही घटना टाकली. त्यांनी मुलीच्या आईला व पोलिसांना बोलावून याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे (DCP Priyanka Narnaware) यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी शाळेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक मनिषा जाधव (PSI Manisha Jadhav) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | minor girl rape case shivaji nagar police station pune rape in school bathroom

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Pune Crime | संतापजनक ! पत्नीला अश्लील व्हिडीओ दाखवून केले अनैसर्गिक कृत्य

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात प्रेमसंबंधातून झालेल्या ‘त्या’ खून प्रकरणात प्रेयसीला अटक, मुलीनेच कट रचल्याचे तपासात आले समोर

Sugar Level Control Tips | मधुमेहाच्या समस्येमध्ये ‘या’ आहेत फायदेशीर वनस्पती; वाढलेली शुगर झटपट कमी करतील, जाणून घ्या

The post Pune Crime | धक्कादायक ! शिवाजीनगर परिसरातील शाळेत भरदिवसा घुसून 11 वर्षाच्या मुलीवर बाथरुममध्ये बलात्कार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article