Header

Pune Crime | पुण्यातील 30 वर्षाच्या तरूणीनं मध्यरात्री दिली सिगारेटची ऑर्डर, 40 वर्षीय डिलीव्हरी बॉयनं पहाटे युवतीसमोरच केलं हस्तमैथुन

Pune Crime | पुण्यातील 30 वर्षाच्या तरूणीनं मध्यरात्री दिली सिगारेटची ऑर्डर, 40 वर्षीय डिलीव्हरी बॉयनं पहाटे युवतीसमोरच केलं हस्तमैथुन

Pune Crime 30 year old girl from Pune orders cigarettes at midnight 40 year old delivery boy masturbates in front of young woman in the early morning

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | वेगवेगळ्या अ‍ॅपद्वारे नागरिक घरबसल्या अगदी जेवणापासून दारूपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन मागवत असतात. मात्र, या ऑर्डर देण्यासाठी येणारे डिलीव्हरी बॉय त्या ऑर्डरवरुन मागविणार्‍याविषयी डोक्यात भलताच गैरसमज करुन घेताना दिसून येतात. कोंढवा (Kondhwa) येथील एका तरुणीबाबत हा प्रकार घडला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी कोंढवा येथे राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जोगेंदर बिंद्रा Jogender Bindra (वय ४०) या डिलीव्हरी बॉयवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कोंढव्यात राहतात. त्यांनी १५ मार्च रोजी रात्री उशिरा डँजो अ‍ॅपद्वारे (Dunzo App) सिगारेटची ऑर्डर दिली होती.
आता इतक्या रात्री अशी ऑर्डर दिलेली पाहून डिलीव्हरी बॉयने वेगळाच समज करुन घेतला.
ही ऑर्डर देण्यासाठी तो पहाटे पावणेतीन वाजता या तरुणीच्या घरी पोहचला. त्याने बेल वाजविली.
तेव्हा या तरुणीने दरवाजा उघडला. बिंद्रा त्याच्या पँटची चैन काढून अश्लिल कृत्य करु लागला.
त्यानं थेट तरूणीच्या समोरच हस्तमैथुन (Masturbation) केलं.
या तरुणीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे (API Sandeep Madhale) आरोपीचा शोध घेत आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

Web Title :- Pune Crime | 30 year old girl from Pune orders cigarettes at midnight 40 year old delivery boy masturbates in front of young woman in the early morning

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा


Governor vs Thackeray Government | राज्यपालांकडून ठाकरे सरकारला आणखी एक धक्का; विशेषाधिकार वापरत घेतला ‘हा’ निर्णय

Diabetes Diet Plan | लसूण डायबिटीजच्या रूग्णांसाठी ‘रामबाण’, शुगर लेव्हल करतो नियंत्रित 

Brain Health Tips | तीष्ण बुद्धीसाठी आवश्य खा ‘हे’ 6 फूड्स ! जाणून घ्या कोणते

The post Pune Crime | पुण्यातील 30 वर्षाच्या तरूणीनं मध्यरात्री दिली सिगारेटची ऑर्डर, 40 वर्षीय डिलीव्हरी बॉयनं पहाटे युवतीसमोरच केलं हस्तमैथुन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article