Header

Pune Crime | दुर्दैवी ! उघड्यावरील वीजेच्या वायरचा शॉक बसून 4 वर्षाच्या ‘शहजाद’चा मृत्यू, कोंढवा परिसरातील घटना

Pune Crime | दुर्दैवी ! उघड्यावरील वीजेच्या वायरचा शॉक बसून 4 वर्षाच्या ‘शहजाद’चा मृत्यू, कोंढवा परिसरातील घटना

Pune Crime | Unfortunately 4 year old Shahzad dies due to shock of open electric wire incident in Kondhwa area

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | अरेबिक भाषेच्या (Arabic Language) शिकवणीसाठी गेलेल्या एका चार वर्षाच्या मुलाचा उघड्यावरील वीजेच्या (Electric Shock) वायरला धक्का बसून मृत्यू (Child Death) झाला. ही दुर्दैवी घटना पुण्यातील (Pune Crime ) कोंढवा (Kondhwa) परिसरातील मीठानगर येथे बुधवारी (दि.2) अडीच वाजता घडली. शहजाद अमीर सय्यद Shahzad Amir Sayyed (वय – 4 रा. नवाझिश पार्क, कोंढवा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत शहजाद याचे वडिल अमीर शौकत सय्यद (Amir Shaukat Sayyed) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खोदकाम करणारे ठेकेदार (Contractor), महावितरणचे अधिकारी (MSEDCL Officer), अभियंता (Engineer) तसेच वायरमन (Wireman) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहजाद बुधवारी दुपारी अरेबिक भाषेच्या क्लाससाठी गेला होता. परंतु क्लासला सुट्टी असल्याने तो घरी येत होता. नवाझिश चौक ते कुबा मस्जिद रोडवर ड्रेनेजचे काम सुरु आहे. या कामासाठी रस्ता खोदण्यात आला होता. त्याच्या बाजूला फिडरचा पिलर होता. त्यामधील बाहेर आलेल्या काही वायरीपैकी एक वायर कट झाली होती.
त्यामुळे ती खाली पडली होती. शहजाद हा त्या ठिकाणावरुन जात असताना त्याचा स्पर्श खाली पडलेल्या वायरीला झाला. शहजाद याला वीजेचा जोरदार धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

यासंदर्भात शहजाद याचे वडील अमीर सय्यद यांनी सांगितले की, पुणे महापालिकेच्या वतीने ड्रेनेजचे काम सुरु होते. त्यावेळी त्याठिकाणी उघड्यावर वायरी पडल्या होत्या. या ठिकाणी कोणीही नव्हते. तसेच कोणताही फलक लावण्यात आला नव्हता. अमीर सय्यद यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil) यांनी सांगितले.

Web Title :- Pune Crime | Unfortunately 4 year old Shahzad dies due to shock of open electric wire incident in Kondhwa area

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी शेवटची संधी ! अन्यथा मिळणार नाही 4,500 रुपयांचा फायदा, 31 मार्चपर्यंत आहे वेळ

Pune Metro | रविवारपासून नियमित धावणार ‘पुणे मेट्रो’, ‘या’ तिकीट दरात पुणेकरांना अनुभवता येणार मेट्रोचा सुखद प्रवास

Pune Cyber Crime | आर्मीची ऑर्डर असल्याचे सांगून व्यावसायिकाला 1 लाखांचा ऑनलाईन गंडा

The post Pune Crime | दुर्दैवी ! उघड्यावरील वीजेच्या वायरचा शॉक बसून 4 वर्षाच्या ‘शहजाद’चा मृत्यू, कोंढवा परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article