Pune Crime | अशीही जबरी चोरी ! प्रवाशाला मारहाण करुन जबरदस्तीने Google Pay वरुन पैसे घेतले ट्रान्सफर करुन लुटले

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | नागरिक आता स्वत:जवळ अधिक पैसे ठेवत नाही. त्याऐवजी ते ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करतात. त्यामुळे रस्त्यात अडवून लोकांना लुटणार्या चोरट्यांची अडचण होऊ लागली आहे. त्यावर दोघा चोरट्यांनी चक्क प्रवाशाला मारहाण करुन त्याच्याकडून Google Pay वर पैसे ट्रान्सफर (G – Pay Transfer) करुन एका प्रवाशाला लुटले. हा प्रकार स्वारगेट एस टी स्टँड (Swargate ST Stand) ते मुकुंदनगर (Mukund Nagar) दरम्यान घडला. (Pune Crime)
याप्रकरणी रोहित ईश्वर पवार (वय २७, रा. रायगड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित पवार हे मुळ गावी जाण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता खासगी गाडीचा स्वारगेट एस टी स्टँडच्या बाहेर शोध घेत होते. इनगेटच्या बाहेर ते थांबले असताना दोघे जण मोटारसायकलवरुन आले. त्यांनी पवार यांना जबरदस्ती करुन मारहाण केली. (Pune Crime)
त्यांना मोटारसायकलवर बसवून मुकुंदनगर येथील सत्यम – शिवम बंगल्यासमोर आणले. तेथे त्यांच्या मोबाईलवरील गुगल पे अॅप (Google Pay App) ओपन करुन पासवर्ड सांगण्यात भाग पाडले. त्यानंतर त्यांच्याकडून प्रथम ५ हजार रुपये व नंतर ६० हजार रुपये व शेवटी २ हजार रुपये असे एकूण ६७ हजार रुपये ट्रान्सफर (Money Transfer) करुन घेतले. पवार यांना मारहाण करुन मोटारसायकलवरुन पळून गेले. या प्रकाराने फिर्यादी घाबरुन गेले. तसेच त्यांचे वडिलांची तब्येत ठीक नसल्याने ते काल पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी आले. पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Such a forcible theft Passengers were beaten and forcibly taken from Google Pay and transferred
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Income Tax Saving | इन्कम टॅक्स वाचवणारी ‘ही’ 2 साधने रिटर्नही देतात भरपूर, जाणून घ्या याबाबत
The post Pune Crime | अशीही जबरी चोरी ! प्रवाशाला मारहाण करुन जबरदस्तीने Google Pay वरुन पैसे घेतले ट्रान्सफर करुन लुटले appeared first on बहुजननामा.