Header

Pune Crime | कोंढव्यातील घटना ! इंस्टाग्रामवरील ओळखीतून महिलेला रात्री भेटीला बोलावले, पतीने दिला चोप

Pune Crime | कोंढव्यातील घटना ! इंस्टाग्रामवरील ओळखीतून महिलेला रात्री भेटीला बोलावले, पतीने दिला चोप

Pune Crime | Incidents in Kondhwa An acquaintance on Instagram called the woman for a night visit and her husband beat her

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | इंस्टाग्रामवरील ओळखीतून (Instagram Account) महिलेला अश्लिल मेसेज (Pornographic Messages) पाठवून तिला रात्री भेटायला बोलाविले. त्याप्रमाणे आल्यावर तिचा पती व त्यांच्या साथीदारांनी या तरुणाला काठीने बेदम चोप दिला. महिलेच्या विनयभंगाच्या (Molestation Case) तक्रारीवरुन कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) या तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार कोंढव्यातील भाग्योदयनगर (Bhagyoday Nagar Kondhwa) येथील बिकानेर स्वीट समोर सोमवारी रात्री ९ वाजता घडला. (Pune Crime)

याप्रकरणी अमर विजयकुमार जाधव Amar Vijaykumar Jadhav (वय २३, रा. पाटीलनगर, बावधन – Bavdhan) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत कोंढव्यातील एका १९ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर जाधव याची व फिर्यादी यांची काही दिवसापूर्वी इंस्टाग्राम वर ओळख झाली होती. अमर जाधव याने इंस्टाग्रामवरुन या महिलेला अश्लिल मेसेज व अश्लील फोटो पाठवून त्यांचा विनयभंग केला. १४ मार्च रोजी त्याने या महिलेला भाग्योदयनगर येथील बिकानेर स्वीट समोर भेटायला बोलावले. तेथे ही महिला आली व तिने त्यास मेसेज करु नकोस, असे समजावून सांगत असताना त्याने तिचा हात धरुन विनयभंग केला.

यावेळी तिच्याबरोबर तिचे पती व दोन साथीदार आले होते. त्यांनी काहीही न विचारता लाकडी काठीने अमर जाधव याच्या डोक्यावर व पाठीवर मारहाण करुन जखमी केले (Pune Crime). जाधव याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही महिला व पती आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. तर या महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विनयभंग केल्याबद्दल अमर जाधव याला अटक केली आहे.

Web Title :- Pune Crime | Incidents in Kondhwa An acquaintance on Instagram called the woman for a night visit and her husband beat her

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Nandurbar Police | महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा पोलीस दल गुन्हे तपासात अव्वल

Digital Eyes Problem | दिर्घकाळ डिजिटल स्क्रीन पाहण्याने डोळ्यांचे कसे होते नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून

Sahakar Maharshi Shankarrao Kolhe Passes Away | माजी मंत्री सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचे निधन

The post Pune Crime | कोंढव्यातील घटना ! इंस्टाग्रामवरील ओळखीतून महिलेला रात्री भेटीला बोलावले, पतीने दिला चोप appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article