Header

Pune Hadapsar Fire | हडपसर येथील गाडीतळावरील 6 दुकाने आगीत भस्मसात (VIDEO)

Pune Hadapsar Fire | हडपसर येथील गाडीतळावरील 6 दुकाने आगीत भस्मसात (VIDEO)

Pune Hadapsar Fire | Hadapsar Gadital Six Shop Fire

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Hadapsar Fire | हडपसर येथील गाडीतळावरील दुकानांना मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत ६ दुकाने जळून भस्मसात झाली. अग्निशामक दलाच्या (Pune Fire Brigade) जवानांना ४० मिनिटांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यास यश आले. (Pune Hadapsar Fire)

हडपसरच्या गाडीतळावर एकाशेजारी एक अशी दुकाने आहेत. मध्यरात्री साडेबारा वाजता या दुकानांना आग लागली. याची खबर अग्निशामक दलाला १२ वाजून ३५ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर २ बंब आणि २ वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले. गाड्या पोहचेपर्यंत आगीने मोठे रौद्र रुप धारण केले होते.

याबाबत अग्निशामक दलाचे अधिकारी प्रमोद सोनवणे यांनी सांगितले की, गाडीतळावरील ही दुकाने एका रांगेत आहेत. त्यात ४ चप्पलची व २ फळांची दुकाने होती. त्यातील एका दुकानात २ जण झोपलेले होते. आगीमुळे झालेल्या आरडाओरड ऐकून ते जागे झाले व बाहेर आले. या आगीत ६ दुकाने जळून खाक झाली. आगीचे नेमके कारण अजून समजले नाही. अग्निशामक दलाने ही आग ४० मिनिटांमध्ये आटोक्यात आणली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

Web Title :- Pune Hadapsar Fire | Hadapsar Gadital Six Shop Fire

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा अनोखा उपक्रम ! जिल्ह्यात पोलीसांकडून 30 ठिकाणी पाणपोईंची सोय

Diabetes Control Tips | शुगर कंट्रोल करण्यासाठी ‘हे’ 5 नियम आहेत आवश्यक, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Pune Crime | पुण्यात फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; विश्रामबाग पोलिसांकडून नराधमाला अटक

The post Pune Hadapsar Fire | हडपसर येथील गाडीतळावरील 6 दुकाने आगीत भस्मसात (VIDEO) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article