Scholarship Examination in Maharashtra | परीक्षा परिषदेचा महत्वपूर्ण निर्णय ! 5 वी आणि 8 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा ‘या’ महिन्यात होणार

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Scholarship Examination in Maharashtra | इयत्ता पाचवी व आठवी (5th And 8th) शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Examination Council) घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Examination in Maharashtra) जून महिन्याच्या अखेरीस होणार आहे. अशी माहिती परीक्षा परिषदेने दिली आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षांचे अर्ज अजूनही भरले नाही. त्यांना देखील अर्ज भरण्यासाठी अखेरची संधी देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
राज्यभरातून इयत्ता पाचवीचे 4,10,395 आठवीचे 2,99, 255 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर, शासनाने विनर कंपनीच्या सहकार्याने परीक्षा घेण्यासंदर्भात सूचना दिली असल्याची माहिती आहे. आगामी काही दिवसात परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Examination) बाबतची सुधारीत माहिती प्रसिद्ध करून परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. म्हणून परिक्षेच्या गोंधळात असलेले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. (Scholarship Examination in Maharashtra)
दरम्यान, नियमानुसार प्रतिवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात नियोजित असते. यंदा ही 20 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली जाणार होती. या अनुषंगाने परीक्षा परिषदेचे डिसेंबर महिन्याचा अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती.
पण यात अनेक विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे अर्ज भरण्यास संधी न मिळाल्याने, अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली गेली. तसेच त्यामुळे परीक्षेचे नियोजन झाले नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
Web Title :- Scholarship Examination in Maharashtra | mahahrashtra scholarship examination for 5th and 8th standard students will be held in month of june 2022 examination 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या किंमतीत किंचित घसरण; जाणून घ्या लेटेस्ट रेट
The post Scholarship Examination in Maharashtra | परीक्षा परिषदेचा महत्वपूर्ण निर्णय ! 5 वी आणि 8 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा ‘या’ महिन्यात होणार appeared first on बहुजननामा.