Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात तेजी, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचा भाव

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. गेल्या काही दिवस झाले सोन्याच्या किमतीत चढउतार दिसून आली. मात्र, आज सोन्या चांदीच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) प्रति तोळा 49,550 रुपये आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 70,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या भावात साधारण घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आता पुन्हा सोन्या चांदीच्या दरात तेजी आल्याचे दिसत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजचा सोन्याचा भाव –
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 49,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 54,060 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 49,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 54,090 रुपये
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 49,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 54,090 रुपये
आजचा चांदीचा दर – 70,000 रुपये (प्रति किलो)
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 15 april 2022
हे देखील वाचा :
The post Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात तेजी, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचा भाव appeared first on बहुजननामा.