Header

LPG Cylinder Price Hike Pune | सर्वसामान्यांना महागाईचा झटका ! व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ, जाणून घ्या घरगुती गॅसचे दर

LPG Cylinder Price Hike Pune | सर्वसामान्यांना महागाईचा झटका ! व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ, जाणून घ्या घरगुती गॅसचे दर

LPG Cylinder Price Hike | lpg cylinder price hike commercial gas cylinder becomes costlier by rs 250 from today

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – LPG Cylinder Price Hike Pune | आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना सरकारने महागाईचा मोठा झटका दिला आहे. पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले असून या नव्या दरानुसार व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ (Commercial LPG Cylinder Price Hike) करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल २५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचवेळी घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २२ मार्च रोजी ५० रुपयांनी वाढ करण्यात आले होते. तर व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाले होते. (LPG Cylinder Price Hike Pune)

१ मार्च रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केल्याचा फटका अगदी चहा टपरीवाल्यापासून ते हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाचा बसणार असून पर्यायाने त्याचा भुर्दंड ग्राहकांच्या खिशाला होणार आहे. काळा बाजारवाल्यांचे फावणार घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी तफावत असल्याने घरगुती गॅस सिलिंडर व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये भरुन त्याची विक्री करणारी मोठी यंत्रणा सध्या सर्वत्र निर्माण झाली आहे. (LPG Cylinder Price Hike Pune)

दोनच दिवसांपूर्वी कात्रज येथे अशाच प्रकारे घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक छोट्या सिलिंडरमध्ये भरताना मोठा स्फोट झाला होता.
त्यात मोठी आग लागली होती. असे प्रकार वारंवार होत असतात. त्याचबरोबर यापूर्वी पोलिसांनी अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने गॅस भरून काळा बाजार करणार्‍यांवर कारवाईही गेली आहे. किंमतीतील वाढती तफावतीमुळे हा काळा बाजार अधिक फोफावू शकतो.

Web Title :- LPG Cylinder Price Hike | lpg cylinder price hike commercial gas cylinder becomes costlier by rs 250 from today

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

PMPML | पुणेकरांसाठी खूशखबर ! पीएमपीचे तिकीट आता मोबाइल ॲपद्वारे काढता येणार

Maharashtra Government Relaxes Covid Restrictions | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात कोरोनावरील सर्व निर्बंध हटवले, जाणून घ्या मास्क मुक्तीबाबत काय झालं ?

Compulsory Helmet Rule In Pune | पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा – कॉलेजच्या कार्यालयात काम करणाऱ्यांना हेल्मेट सक्ती – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

The post LPG Cylinder Price Hike Pune | सर्वसामान्यांना महागाईचा झटका ! व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ, जाणून घ्या घरगुती गॅसचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article