Header

Pune Crime | फेकलेले गरम ताट 3 वर्षाच्या बाळाच्या अंगावर पडले अन्…; सिद्धार्थनगरमधील घटना

Pune Crime | फेकलेले गरम ताट 3 वर्षाच्या बाळाच्या अंगावर पडले अन्…; सिद्धार्थनगरमधील घटना

Crime News In Siddharth Nagar Dapodi Khadki Police Station Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन–  Pune Crime | पती पत्नीच्या भांडणात पतीने जेवणाचे गरम ताट फेकले, ते झोपलेल्या ३ वर्षाच्या बाळाच्या अंगावर जाऊन पडले. त्यावरुन जाब विचारल्याने त्याने घरातील लोकांना मारहाण करुन जखमी केले. दापोडीमधील सिद्धार्थनगर (Siddharth Nagar Dapodi) येथे ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. (Pune Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याप्रकरणी २१ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात Khadki Police Station ( गु. रजि. नं. १०९/२२) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ऋषिकेश अरुण भिसे (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश भिसे व त्याची पत्नी पल्लवी यांच्यात भांडणे झाली. या भांडणामध्ये ऋषिकेश याने पत्नीच्या अंगावर जेवणाचे गरम ताट फेकून मारले. ही ताट बाजूला झोपलेल्या ३ वर्षाच्या त्यांच्या बाळाच्या अंगावर जाऊन पडले. त्यावेळी फिर्यादी, तिचे पती व सासू यांनी ऋषिकेश याला कशाला भांडणे करतोस, बाळाकडे बघ जरा, असे सांगितले. त्याचा राग येऊन त्याने दरवाजाला लावलेली वीट उचलून फिर्यादी मानसीचे पती निखिल याच्या डोक्यात मारली. त्यांच्या मुलीच्या पायावर मारुन जखमी केले. त्यांची भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या सासूला धक्काबुक्की करुन मारहाण करुन शिवीगाळ केली. सहायक पोलीस निरीक्षक भांबड तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Crime News In Siddharth Nagar Dapodi Khadki Police Station Pune

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Municipal Corporation (PMC) | अतिक्रमण कारवाई करताना ‘पंचनामा’ करणे शक्य नाही ! पालिकेच्या गोदामात चोर्‍या होतात परंतू…

BCCI On Virat Kohli | ‘किंग’ कोहली IPL मधील फॉमर्मुळे गमावू शकतो भारतीय T-20 च्या संघातील जागा; BCCI ने दिले संकेत!

 

The post Pune Crime | फेकलेले गरम ताट 3 वर्षाच्या बाळाच्या अंगावर पडले अन्…; सिद्धार्थनगरमधील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article