Header

Pune Crime | स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! जस्ट डायलवर चौकशी केली की मिळत होता Merian Body Spa चा ‘मेसेज’

Pune Crime | स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! जस्ट डायलवर चौकशी केली की मिळत होता Merian Body Spa चा ‘मेसेज’

pune crime exposed prostitution racket under the name of spa inquired on just dial to get merian body spas message

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | विमाननगर (Vimannagar) येथील एका आलिशान स्पाच्या (Spa Center In Pune) नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा (Prostitution) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell, Pune) पर्दाफाश केला आहे. मेरियन बॉडी स्पा (Merian Body Spa Viman Nagar) असे या मसाज पार्लरचे (Massage Parlor In Pune) नाव असून तेथून परराज्यातील ३ तरुणींची सुटका करण्यात आली आहे. मॅनेजर सुफीयान अक्रम अली (Manager Sufiyan Akram Ali), अब्दुल मालकी मफूर अली (Abdul Maliki Mafoor Ali) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे असून, अब्दुल हबीब (Abdul Habib) आणि अन्वर दाऊदभाई अहमदाबादी (Anwar Dawoodbhai Ahmedabadi) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

मॅनेजर सुफीयान अक्रम अली (वय २२, रा. कोणार्क व्हॅलेंटाईन सोसायटीसमोर, विमाननगर, मुळ रा. आसाम – Assam) आणि त्याचा साथीदार मॅनेजर अब्दुल मालकी मफूर अली (वय २१, रा. येरवडा – Yerwada) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या स्पाचा मालक, भागीदार अब्दुल हबीच (रा. आसाम), अन्वर दाऊदभाई अहमदाबादी आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरु आहे. (Pune Crime)

विमाननगर येथील सिंबायोसिस रोडवर (Symbiosis Road Vimannagar) मेरीयन स्पा रो हाऊस (Merian Spa Row House) येथे हा मसाज पार्लर सुरु होता. मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांनी (Pune Police) बनावट ग्राहक पाठविले. तेथे मसाजसह एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली जादा रक्कम आकारुन वेश्या व्यवसाय करीत असल्याची खात्री झाली. त्यानंतर पोलिसांनी या स्पावर छापा टाकला. त्यात तेथील मणीपूर (Manipur) येथील एका तरुणीसह तिघा तरुणींची सुटका केली. दोन मॅनेजरला अटक करण्यात आली असून २३ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

विमाननगर परिसरातील एखाद्याने जस्ट डायल (Just Dial) या फोन सुविधेमध्ये मसाज पार्लरबाबत कोणत्याही प्रकारची माहितीची विचारणा केली की, त्या व्यक्तीच्या मोबाईलवर मेरीयन मसाज पार्लरचे मेसेज (Message) येणे सुरु होत व त्यातून त्या व्यक्तीला ग्राहक बनवून, मसाजचे नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात होता.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाटगे (DCP Shrinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik), पोलीस उपनिरीखक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar), हवालदार कुमावत, अश्विनी केकाण, हनुमंत कांबळे, अण्णा माने, इरफान पठाण, संदीप कोळगे यांनी केली आहे.

Web Title :- pune crime exposed prostitution racket under the name of spa inquired on just dial to get merian body spas message

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Maharashtra IPS Officers Transfer | राज्यातील 15 आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या; मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथील अधिकार्‍यांचा समावेश

Maharashtra IPS Officer Transfer | पुण्याचे सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांची बदली, संदीप कर्णिक पुण्याचे नवे Jt CP

The post Pune Crime | स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! जस्ट डायलवर चौकशी केली की मिळत होता Merian Body Spa चा ‘मेसेज’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article