Pune Crime | येरवडा मध्यवर्ती कारागृहात सराईत गुन्हेगारांमध्ये हाणामारी

पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | येरवडा मध्यवर्ती कारागृहात (Yerawada Central Jail) असलेल्या दोघा गुन्हेगारांनी सिगारेटची राख डोळ्यात गेल्याच्या कारणावरुन एकाच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. ही घटना येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल नं. ३ मधील बॅरेक नं. ७ मध्ये गुरुवारी सकाळी पावणे बारा वाजता घडली. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी अमोल कालिदास लगस (वय २२) याने येरवडा पोलीस ठाण्यात Yerwada Police Station (गु. रजि़ नं. १८४/२२) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राकेश ऊर्फ राख्या जॉनी यकट आणि सुरेश बळीराम दयाळु यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना कारागृहातील सर्कल नं. ३ मधील बॅरेक नं. ७ मध्ये ठेवले आहे. तेथे असताना १५ दिवसांपूर्वी आरोपी राकेश याच्या सिगारेटची राख डोळ्यात गेल्याने त्यांच्यात भांडणे झाली होती. या भांडणाच्या कारणावरुन गुरुवारी सकाळी दोघांनी अमोल लगस याच्या डोक्यात दगडाने मारुन जखमी केले. लगस याच्यावर उपचार करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक काटे (PSI Kate) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Fight between pune criminals in Yerwada Central Jail
हे देखील वाचा :
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव
The post Pune Crime | येरवडा मध्यवर्ती कारागृहात सराईत गुन्हेगारांमध्ये हाणामारी appeared first on बहुजननामा.