Pune Crime | पूर्ववैमनस्यावरुन गुन्हेगारावर दोघांनी केला कोयत्याने वार; लोहगाव परिसरातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पूर्ववैमनस्यावरुन दोघा सराईत गुन्हेगारांनी (Pune Criminals) एका गुन्हेगारावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Kill). याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) ऋषिकेश रेवलिया (रा. साठेवस्ती, लोहगाव) आणि पिंट्या ऊर्फ ओंकार नारायणी (रा. ओव्हाळवस्ती, लोहगाव) या सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत आशिष रवींद्र निकम (वय २०, रा. कदम चाळ, लोहगाव) याने विमानतळ पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. १५७/२२) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र सानिध्य कांबळे हे गुरुवारी रात्री आठ वाजता लोहगावातील रायबा तालीम समोर थांबले होते. तेव्हा तेथे आरोपी आले. जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने फिर्यादीचे डोक्यात व हातावर वार करुन गंभीर जखमी केले (Attempt To Murder). हवेत कोयता फिरवून हा तर ट्रेलर आहे. आमच्या वाटेला गेला तर एकएकाला गोळ्या घालीन, असे म्हणून दहशत पसरवली. फिर्यादी आणि आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Record) आहेत. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Attempt To Kill Incident in Lohegaon Area Viman Nagar Police Station Limits
हे देखील वाचा :
The post Pune Crime | पूर्ववैमनस्यावरुन गुन्हेगारावर दोघांनी केला कोयत्याने वार; लोहगाव परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.