Header

Pune Crime | दहशत पसरविण्यासाठी टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड; जुन्या वडारवाडीतील घटनेत दोघांना अटक

Pune Crime | दहशत पसरविण्यासाठी टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड; जुन्या वडारवाडीतील घटनेत दोघांना अटक

Pune Crime | Vandalism of vehicles by mobs to spread terror Two arrested in Old Vadarwadi incident

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | परिसरात आपली दहशत पसरविण्यासाठी पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्याचे लोण आता वडारवाडीतही आले आहे. जुन्या वडारवाडीत (Wadarwadi Pune) एका टोळक्याने काही कारण नसताना पार्क केलेल्या गाड्यांवर दगडफेक (Vandalism By Throwing Stones At Parked Vehicles) करुन तोडफोड केली. याप्रकरणी जावेद जानशा शेख (वय ५१, रा. मंजाळकर चौक, जुनी वडारवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

त्यावरुन पोलिसांनी ईस्माइल शेख (वय १९, रा. पठाण गल्ली, वडारवाडी) आणि रोहित संजय भोसले (वय २५, रा. वडारवाडी) यांना अटक केली आहे. तसेच आकाश ओरसे (रा. जय बजरंग मित्र मंडळ, वडारवाडी) याच्यासह इतर ३ ते ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईस्माईल शेख व त्याचे साथीदार १४ एप्रिल रोजी मध्यरात्री साडे बारा वाजता मंजाळकर चौकात आले. त्यांनी काही कारण नसताना घरासमोर पार्क केलेल्या गाड्यांवर दगडफेक करुन ५ दुचाकी गाड्यांचे नुकसान केले. मोठमोठ्याने आरडाओरडा करत दहशत निर्माण करुन निघून गेले. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Vandalism of vehicles by mobs to spread terror Two arrested in Old Vadarwadi incident

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Pune Crime | बायकांमधील भांडणाने मैत्रीत ओतला ‘बिबा’ ! मित्रावर कटरने हल्ला करुन केले जखमी, वानवडी परिसरातील घटना

Rupali Patil | ‘कायदा हातात घेतल्यावर कारवाई होणार, राज ठाकरेंनी…”; रूपाली पाटील यांचा मनसेवर निशाणा !

Supreme Court On Hawkers | ‘फेरीवाल्यांना रात्री रस्त्यावर साहित्य ठेवण्याचा हक्क नाही’ – सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

The post Pune Crime | दहशत पसरविण्यासाठी टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड; जुन्या वडारवाडीतील घटनेत दोघांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article