Header

Sanjay Raut on Devendra Fadnavis | ‘हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा आहे का?’; फडणवीसांच्या सवालावर संजय राऊतांचं उत्तर, म्हणाले…

Sanjay Raut on Devendra Fadnavis | ‘हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा आहे का?’; फडणवीसांच्या सवालावर संजय राऊतांचं उत्तर, म्हणाले…

Sanjay Raut on Devendra Fadnavis | shivsena leader and mp sanjay raut answers bjp leader devendra fadanvis question over hanuman chalisa row

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Sanjay Raut on Devendra Fadnavis | मागील काही दिवसांपासून ‘हनुमान चालीसा पठण’ (Hanuman Chalisa Pathan) यावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन राणा दाम्पत्यालाही (MP Navneet Rana And MLA Ravi Rana) मुंबईत अटक झाली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकामध्ये राजकीय शीतयुद्ध रंगलं आहे. यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला. काल फडणवीस मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही यावर उत्तर दिलं आहे. (Sanjay Raut on Devendra Fadnavis)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

‘हनुमान चालिसा पठण करणं महाराष्ट्रात गुन्हा आहे का ?’ असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. ”तुरूंगात खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांंना अतिशय वाईट वागणूक दिली जातेय. हनुमान चालिसा म्हणण्याला इतका विरोध कशासाठी? भारतात हनुमान चालिसा पठण करायची नाही, मग काय पाकिस्तानात म्हणायची का? हनुमान चालिसा मातोश्रीबाहेर पठण करू म्हणाले, तर राणा दाम्पत्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. हनुमान चालिसा म्हटल्याने जर राजद्रोह होत असेल, तर मग आमच्यातला प्रत्येकजण रोज राजद्रोह करेल,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut on Devendra Fadnavis)

 

 

”विरोधकांना नामोहरम करण्यासाठी, त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी विभाग वाटून घेतले आहेत. मुंबईत सध्या जे काही घडत आहे त्याची सुत्रे मुख्यमंत्री कार्यालयाकडून हलवली जात आहेत. तर राज्यात इतरत्र जे काही घडतंय ते गृहमंत्री कार्यालयाकडून घडवलं जातंय. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी करायचं आणि महाराष्ट्राच्या इतर भागात गृहमंत्र्यांनी करायचं असं ठरलं आहे,” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

दरम्यान, फडणवीस यांचा कालच्या पत्रकार परिषदेतील फोटो शेअर करत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरवरुन हल्लाबोल केला आहे. ”भाजपा नेत्यांनी विचारलं आहे की, हनुमान चालीसा म्हणणे हे महाराष्ट्रामध्ये कायद्याविरोधात आहे का? तर नक्कीच नाही. मात्र हनुमानाचा वापर राजकारणासाठी करणे आणि त्याच्या नावाखाली हिंसेसाठी लोकांना प्रवृत्त करणे हा गुन्हा आहे. चालीसा ही मंदिरांत अथवा देवासमोर म्हटली जाते. रस्त्यावर तिचं पठण करणे हे धर्माच्याविरोधात आहे. हा राजद्रोह नाही तर ही भाजपाकडून केली जाणारी ईश्वनिंदा आहे,” असं राऊत म्हणाले.

 

 

Web Title : Sanjay Raut on Devendra Fadnavis | shivsena leader and mp sanjay raut answers bjp
leader devendra fadanvis question over hanuman chalisa row

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील हडपसर परिसरात विवाहितेची टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या; पतीसह निवृत्त प्राध्यापक सासर्‍यांना अटक

Mumbai High Court On Pune Water Supply | पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांत टँकरने पाणी पुरवठा करा – मुंबई हाय कोर्ट

MNS Chief Raj Thackeray | ‘औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश काढले नाहीत’ ! पण, राज ठाकरेंच्या सभेवर प्रश्नचिन्ह?

 

The post Sanjay Raut on Devendra Fadnavis | ‘हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा आहे का?’; फडणवीसांच्या सवालावर संजय राऊतांचं उत्तर, म्हणाले… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article